बॉलिवूडचा हॅण्डसम हंक जॉन अब्राहम ब-याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसला. त्याची प्रमुख भूमिका असलेला 'वेलकम बॅक' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील त्याची आणि श्रुती हासनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मॉडेलिंग क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेल्या जॉनची गणना बी टाऊनमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. जॉनने आपल्या करिअरची सुरुवात 2003मध्ये 'जिस्म' या सिनेमाद्वारे केली होती. 12 वर्षांच्या करिअरमध्ये जॉनने जवळजवळ चाळीसहून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याने आत्तापर्यंत 'धूम', 'जिंदा', 'वॉटर', 'दोस्ताना', 'फोर्स', 'शूटआउट एट वडाला', 'मद्रास कैफे' हे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. मॉडेल आणि अभिनेत्यासोबतच जॉनने निर्माता म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'विकी डोनर' या सिनेमाचा जॉन निर्माता होता. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर यश मिळवले होते.
सुंदर घराचा मालक आहे जॉन...
जॉन एका सुंदर आशियानाचा मालक आहे. मुंबईस्थित त्याच्या घराचे इंटेरियर कुणाच्याही नजरेत भरणारे आहे. या घराचे इंटेरियर जॉनचे वडील अब्राहम जॉन आणि भाऊ एलनने केले आहे. जॉनचे हे घर पाच हजार चौ. फुटात असून दोन मजली आहे. घरातील बेडरुम, किचन, ड्रॉईंग रुम, डायनिंग रुम आणि हॉलची छायाचित्रे बघून त्याच्या सुंदर इंटेरियरचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जॉनच्या या लॅव्हिश घराची खास झलक दाखवत आहोत...