आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PHOTOS: Bipasha, Dino, Harman At Madhavan's Birthday Bash

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Best Buddies सोबत दिसली बिपाशा, एक्स-बॉयफ्रेंडला केले Ignore

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिपाशा बसु, रॉकी एस, डिनो मोरिया, हरमन बावेजा)
मुंबईः सोमवारी मुंबईतील एका हॉटेलमध्ये अभिनेता आर. माधवनच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत टिंसल टाउनमधील अनेक सेलेब्स पोहोचले होते. मात्र सर्वात जास्त लाइमलाइटमध्ये राहिली अभिनेत्री बिपाशा बसू.
ब्लॅक अँड ग्रे फूल स्लीव्स शॉर्ट ड्रेसमध्ये दिसलेली बिपाशा तिचा बेस्ट फ्रेंज रॉकी एससोबत पार्टीत दाखल झाली. पार्टीतून बाहेर पडताना ती एक्स बॉयफ्रेंड डीनो मोरिया आणि रॉकीसोबत मस्तीच्या मुडमध्ये दिसली. पार्टीत डीनो आणि बिपाशाची कूल केमिस्ट्री बघून दोघेही जुन्या गोष्टी विसरुन पुन्हा मित्र झाल्याचे दिसले.
उल्लेखनीय बाब म्हणजे या बर्थडे बॅशमध्ये बिपाशाचा एक्स बॉयफ्रेंड हरमन बावेजासुद्धा उपस्थित होता. मात्र पार्टीत बिपाशा आणि हरमन एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले. अलीकडेच या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. याच कारणामुळे बहुतेक हे दोघे एकमेकांना टाळत असावेत.
2001 मध्ये 'अजनबी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बिपाशा सिनेमांमध्ये तिच्या लव्ह अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिली आहे. बिपाशाचे नाव सर्वप्रथम डीनो मोरियासोबत जुळले. डीनोसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जॉन अब्राहमची एन्ट्री तिच्या आयुष्यात झाली. त्यानंतर हरमन बावेजासोबत तिचे नाव जुळले. हरमनसोबत तिच्या लग्नाच्या बातम्यासुद्धा माध्यमांमध्ये आल्या होत्या. मात्र 2015 मध्ये 'अलोन' या सिनेमाच्या सेटवर अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत तिची जवळीक वाढली. हरमनसोबत ब्रेकअपचे हेच कारण ठरले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पार्टीत क्लिक झालेले बिपाशा बसू, डीनो मोरिया, रॉकी एस आणि हरमन बावेजाचे फोटोज...