आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमचे एकेकाळी होते चक्क 87 किलो वजन, स्ट्रिक्ट डाएट आणि एक्सरसाइजने घटवले वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनम कपूर पूर्वी आणि आत्ता)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने आज वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. सोनमचा जन्म 9 जून 1985 रोजी मुंबईतील चेंबूर येथे झाला. तसे पाहता फॅशनिस्टा सोनमची गणना आज बॉलिवूडमधील स्लिम अभिनेत्रींमध्ये होते. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनम एवढी बारीक नव्हती. आपल्या वाढलेल्या वजनामुळे ती काळजीत पडली होती.
2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या सोनमने आपले 32 किलो वजन कमी करावे लागले होते. सिंगापूरमध्ये अभिनयाचे धडे गिरवून भारतात परतलेल्या सोनमचे वजन तब्बल 87 किलो होते.
वजन कमी केल्यानंतर सोनममध्ये एवढा फरक पडला आहे, की पूर्वीची तिची छायाचित्रे पाहून ही सोनमच आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. सोनम केवळ बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रीच नाहीये, तर उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी तिचे कौतुकसुद्धा होते.
एका मुलाखतीत सोनमने आपला डाएट प्लान चाहत्यांसोबत शेअर केला होता. सोनमने सांगितले, "मी माझ्या दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने करते. त्यापूर्वी एक चम्मच शहद खाते आणि मग पाणी पिते. पूर्वी सकाळी उठल्यानंतर कॉफी घ्यायचे. मात्र कॉफी आरोग्यासाठी उत्तम नसल्याचे नंतर मला कळले. मी प्रत्येक तरुणीला सल्ला देईल, की आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करु नका. सकाळी व्हेजिटेबल सूप पिणे मी पसंत करते. मात्र कधी कधी आपण झोपेतच आहोत, असा भास झाल्यानंतर मी कॉफी घेते, मात्र विदाऊट शूगर. शक्य तितके साखरेपासून लांब राहा."
जाणून घ्या सोनमच्या डाएट आणि फिटनेस शेड्युलविषयी...
सोनमचे डाएट
>> नाश्ता - एका अंड्याचे ऑम्लेट, एक टोस्ट, एक फळ आणि एक ग्लास कोमट पाणी
>> वर्कआउटनंतर - ज्युससोबत प्रोटीन शेक
>> लंच - चिकन, पोळी, भात, दही आणि फळ. रेड मीटकडे ती दुर्लक्ष करते.
>> डिनर - रात्री लवकरात लवकर जेवण करण्यावर तिचा भर असतो. झोपण्याच्या तीन तासांपूर्वी सोनम जेवण घेते. जेवणात ग्रिल्ड फिश, चिकन, सँडविच, सलाद आणि एक ग्लास प्रोटीनयुक्त शेक घेते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कसे वर्कआउट करते सोनम, सोबतच वाचा, सोनमने दिलेल्या फिटनेस टिप्स...