आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपनंतर कतरिनाने मुंबईत शोधला नवा आशियाना, हा आहे नवीन घराचा पत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वांद्रा परिसरातील या बिल्डिंगमध्ये कतरिनाचे नवीन घर आहे. इनसेटमध्ये कतरिना कैफ - Divya Marathi
वांद्रा परिसरातील या बिल्डिंगमध्ये कतरिनाचे नवीन घर आहे. इनसेटमध्ये कतरिना कैफ
मुंबईः काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाने त्याचे कार्टर रोडस्थित अपार्टमेंट सोडले होते. त्यानंतर ती नवीन घराचा शोध घेत असल्याची बातमी गेल्या आठवड्यात मीडियात आली होती. कतरिना एक्स बॉयफ्रेंड अर्थातच अभिनेता सलमान खानची मॅनेजर रेश्मा शेट्टीसोबत मुंबईत घर शोधत असल्याचे फोटो मीडियात प्रकाशित झाले होते. अखेर कतरिनाची घरासाठीची शोधाशोध संपली असून तिला मायानगरी मुंबईत नवीन आशियाना मिळाला आहे.

मुंबईतील वांद्रास्थित परिसरातील माऊंट मेरी चर्चजवळ एका अपार्टमेंटमध्ये कतरिनाने भाडे तत्त्वावर फ्लॅट फायनल केल्याचे वृत्त आहे. लवकरच कतरिना या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणारेय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ''कतरिना लवकरच या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणारेय. याच बिल्डिंगमध्ये दिग्दर्शक सुभाष घई वास्तव्याला आहेत. गेल्याच आठवड्यात डिल फायनल झाली असून पुढील तीन वर्षांसाठी कतरिनाने हा फ्लॅट भाडे तत्त्वार घेतला आहे.''

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कतरिनाचा नवा आशियाना असलेल्या बिल्डिंगची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...