आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 महिन्यात 15 कोटींचा खर्च करुन तयार झाला रणबीर-अनुष्काच्या 'बॉम्बे वेलवेट'चा सेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा स्टारर बॉम्बे वेलवेटच्या सेटचा लूक)
मुंबईः अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-अनुष्का शर्मा स्टारर 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमात 60च्या दशकातील मुंबईचे दर्शन घडणार आहे. मात्र या सिनेमाचा सेट अर्थातच 60 च्या दशकातील मुंबई शहराचा सेट श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथे तयार करण्यात आल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाचे आर्ट डायरेक्टर समीर सावंत यांनी सांगितले, "शूटिंगसाठी आम्ही कोलंबो, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथील ठिकाणे बघितली. बजेटनुसार आम्ही कोलंबोची निवड केली. कारण येथील 40 रिअल लोकेशन्सला मुंबईतील जुन्या इमारतींच्या रुपात पडद्यावर दाखवणे शक्य होते. ज्या ठिकाणी सिनेमाचा सेट बनवण्यात आला ती जागा कोलंबोपासून सहा तासांच्या अंतरावर आहे."
समीर सांगतात, ''9 एकर परिसरात आमच्या प्रॉडक्शन टीमला काही लँडमार्क बनवायचे होते. यामध्ये खादी ग्रामोद्योग भवन, एलआयसी बिल्डींग, सीएसटी स्टेशन (व्हीटी स्टेशन)चा परिसर आणि जहांगिर आर्ट गॅलरी या ठिकाणांचा समावेश होता. याशिवाय मुंबईतील कोलाबा परिसरातील एक प्रसिद्ध इमारतसुद्धा येथे तयार करण्यात आली. आर्ट डायरेक्टर समीर यांनी सांगितल्याप्रमाणे, "बजेट कमी असल्याने 40 पैकी केवळ 18 इमारतींचे रिक्रिएशन करण्यात आले. श्रीलंकेत 60च्या दशकातील मुंबई उभी करण्यासाठी आम्हाला 10 महिन्यांचा काळ आणि 15 कोटींचा खर्च आला."
समीर यांनी पुढे सांगितले, "लोकेशन्स तयार करण्यासाठी सर्वात मोठी अडचण ही ओबडथोबड जमीन होती. इमारती उभ्या करण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम 9 एकर जमीन सपाट करावी लागली. याशिवाय साइनबोर्ड्सवरसुद्धा काम करावे लागले. रस्त्यांवर लागलेले साइनबोर्ड्स हे कोलंबोच्या स्थानिक भाषेत (सिंहली) होते. टीमने त्यांना मराठीत बदलले. बॉम्बे वेलवेटमध्ये हिंदीऐवजी 60 च्या दशकातील स्थानिक भाषेचा अर्थातच मराठीचा वापर करण्यात आला आहे."
सेट व्यतिरिक्त सिनेमातील अनेक सीन्स हे कोलंबो येथील रिअल लोकेशन्सवर शूट करण्यात आले. विशेषतः खंबाटा (करण जोहर) चे घर, रोजी (अनुष्का शर्मा) चे घर, एक बिलियर्ड्स क्लब, स्ट्रीट आणि बँक हे सर्व रिअल लोकेशन्स आहेत. समीर यांनी हा देखील खुलासा केला, की कोलंबो रेल्वे स्टेशनला विक्टोरिया टर्मिनल (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनल) चे रुप देण्यात आले.
समीर यांनी Divyamarathi.comसोबत कोलंबो येथे उभारण्यात आलेल्या मुंबई शहराची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता.
नोटः 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा 15 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय.