मुंबई: गेल्या 8 जूनला बॉलिवूड अभिनेत्री आणि अक्षय कुमारची सासू डिंपल कपाडियाने वयाची 60 वर्षे पूर्ण केली. त्यांचे पूर्ण नाव डिंपल चुन्नीलाल कपाडिया आहे. डिंपल गुजरातच्या आहेत, त्यांचे वडिलोपार्जित घर सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या चोटीलामध्ये आहे. डिंपल यांचे बालपण चोटीलामध्ये स्थित याच घरात गेले. सध्या या घरात डिंपल यांचे काका राहतात. शालेय शिक्षण पूर्ण होताच डिंपल यांचे कुटुंबीय मुंबईला शिफ्ट झाले. डिंपल मुंबईत सध्या 'वास्तु' नावाच्या अपार्टमेंटमध्ये राहतात.
मुंबईमध्ये 1800 स्क्वेअर फुटमध्ये पसरलेले आहे हे अपार्टमेंट...
- डिंपल यांच्या मुंबईमध्ये स्थित अपार्टमेंटचे इंटीरिअर प्रसिध्द डिझाइनर बेलडी अबू (जानी) आणि संदीप खोसला यांनी केले आहे.
- डिझाइनर्सने डिंपल यांच्या घराला इटॅलिअन मार्बलने पेंटेड स्क्रिन डोरने सजवले आहे.
- या घरात डिंपलचे आर्ट कलेक्शनसुध्दा पाहण्यासारखे होते. अबु-संदीपने मास्टर बेडरूमच्या भिंती गोल्ड अॅसेंटसोबतच जांभळ्या कलरच्या ठेवल्या आहेत.
अशी सुरु झाली डिंपल आणि राजेश खन्ना यांची लव्हस्टोरी...
हिंदी फिल्म इंडस्ट्रीची ग्लॅमरस अभिनेत्री आणि गुजराती गर्ल डिंपल कपाडिया यांची राजेश यांच्याशी पहिली भेट अहमदाबादच्या नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना 70च्या दशकात नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. इथेच त्यांची भेट डिंपल यांच्याशी झाली. ते पहिल्याच नजरेत डिंपल यांच्या प्रेमात पडले. येथूनच राजेश आणि डिंपल यांच्या लव्ह-स्टोरीला सुरूवात झाली. तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या काळात राजेश सतत गुजरातचा प्रवास करायचे. त्यांना गुजराती नाटकांची आवड होती. गुजराती नाटकार आणि अभिनेते प्रवीण जोशी यांच्या नाटकांचे चाहते होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डिंपल यांच्या मुंबईमधील घराचे Photos...