आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : घराघरात पोहोचलेल्या आर्याचे चित्रपटात पदार्पण, पाहा तिचा Glamours Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केतकी माटेगावर हिने गायनाबरोबरच अभिनयातही मोठी मजल मारली आहे. अनेक चित्रपटांत तिच्या भूमिका गाजल्या. तिच्याच प्रमाणे आणखी एक तरुण चेहरा आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा तरुण चेहरा म्हणजे, आर्या आंबेकर. अनेक वर्षांपूर्वी झी मराठीवरील गाजलेल्या सारेगमपच्या लिटिम चॅम्पस पर्वातून आर्या घराघरात पोहोचली होती. पण त्यावेळी तिची ओळख एक लहानगी गायिका अशी होती. पण हीच लहानगी आर्या आता एक चित्रपटातून आपल्या सर्वांसमोर येणार आहे. मुंबई-पुणे-मुंबई सारख्या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या ती सध्या काय करते चित्रपटात आर्या आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात तेजश्री प्रधान हिची प्रमुख भूमिका असून, तिच्या किशोरवयातील पात्राची महत्त्वाची भूमिका आर्या साकारणार आहे. यापूर्वी आर्या तिच्या अलवार मन हे माझे नावाच्या तिच्याच अल्बमच्या व्हिडीओत झळकली होती. त्यावेळीच तिचा ग्लॅमरस लूक समोर आला होता. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आर्या नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरणार असे दिसते आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आर्याचे काही PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...