आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS : सलमानचे फार्म हाऊस, रिलॅक्स करण्याबरोबरच यातून कमाईही करतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खान याचे पनवेल येथील फार्म हाऊस सगळ्यांनाच माहिती आहे. या फार्महाऊसवर सलमान खान रिलॅक्स करण्यासाठी जात असतो. पण एवढेच नाही कुटुंब आणि मित्रांबरोबर पार्ट्या करण्याबरोबरच सलमान चित्रपटाच्या शुटिंगसाठी वापर करून फार्म हाऊसद्वारे कमाईही करतो. सलमान 'टायगर जिंदा है'च्या शुटिंगनंतर 'बिग बॉस'मध्ये प्रंचंड बिझी होणार आहे. त्याआधी याठिकाणी तो रिलॅक्स होण्यासाठी जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 
 
150 एकरात पसरले आहे फार्म हाऊस...
पनवेल स्थित सलमानचे फार्महाऊस पार्टी आणि सोशल इव्हेंटसमुळे नेहमीच चर्चेत असते. सलमानच्या गाजलेल्या बजरंगी भाईजान या सिनेमाचे काही सीन्स याच फार्महाऊसमध्ये शूट झाले होते. सुल्तानसाठी याच ठिकाणी सलमानने ट्रेनिंग घेतले. नवी मुंबईतील पनवेल येथे असलेल्या या फार्म हाऊसचे नाव सलमानने अर्पिता फार्म्स असे ठेवले आहे. हे नाव सलमानच्या धाकट्या बहिणीच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. तब्बल 150 एकरात सलमानचे हे फार्म हाऊस आहे.
 
काय आहे वैशिष्ट्य...
अर्पिता फार्म्स 150 एकरात पसरले आहे. प्रवेशद्वारावरील बोर्डवर "A bird in bush is better than two on the plate." असे लिहिले आहे. सलमानला बाइकिंग आणि हॉर्स रायडिंग पसंत आहे. फार्म हाऊसमध्ये पाळीव प्राणी (विशेषतः घोडे) आहेत. त्यांच्या देखभालीसाठी एक मोठी जागा येथे आहे. सलमान आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर अनेकदा येथे घोडेस्वारीचा आनंद घेताना दिसले आहेत. सलमानला येथे बाइक रायडिंगसोबत ATV गाडी चालवणे पसंत आहे. सलमान फिटनेस फ्रिक असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. याच कारणामुळे येथे अत्याधुनिक जिमसुद्धा तयार करण्यात आले आहे. शिवाय स्विमिंग एरियासुद्धा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पहिल्यांदाच बघा सलमानच्या अर्पिता फार्म्सचे INSIDE PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...