आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

So Cute... रितेशने शेअर केला पहिला फॅमिली फोटो, पाहा गोंडस रिआनची खास झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या गोंडस बाळासोबत रितेश आणि जेनेलिया)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलिया आणि त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा रिआनसोबतची खास छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत. यापैकी एका छायाचित्रात हे तिघेही क्यूट पोज देताना दिसत आहेत. 26 मे रोजी रितेशचे वडील विलासराव देशमुख यांची 70 वी जयंती होती. याच दिवशी रिहान सहा महिन्यांचा झाला. यानिमित्ताने रितेशने रिआनसोबतचे आणखी एक छायाचित्र शेअर केले आहे. ही छायाचित्रे शेअर करताना रितेशने लिहिले, ''Riaan completes Us'' आणि ''On my Father's ‪#‎70thBirthAnniversary‬ Riaan turns 6 months old.''
26 मे रोजी लातूर येथे रितेशने पत्नी आणि मुलासोबत विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तेथील या तिघांचे छायाचित्रसुद्धा सोशल साइटवर बघायला मिळतंय.
रितेशने पत्नी आणि मुलासोबतचे शेअर केलेले हे पहिलेच छायाचित्र आहे. यापूर्वी जेनेलिया आणि रितेशने रिआनची काही छायाचित्रे आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली होती. मात्र आत्तापर्यंत हे तिघेही एका छायाचित्रात दिसले नव्हते.
काही दिवसांपूर्वी जेनेलियाने ख्रिसमसच्या निमित्ताने रिहानचा एक फोटो शेअर केला होता. रिआनने या छायाचित्रात सांता क्लॉजसारखा रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि त्याच्या आपल्या चेह-यावर हात ठेवलेला आहे. जेनेलियाने हे छायाचित्र पोस्ट करून लिहिले होते, 'Most Special Xmas Of My Life'. जेनेलियाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रिआनला जन्म दिला.
पुढे पाहा, रितेशने शेअर केलेली पत्नी आणि मुलासोबतची लेटेस्ट छायाचित्रे...