आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून असा भव्यदिव्य आहे यशराज स्टुडिओ, येथे शूट झाले शाहरुख, ऋषी कपूरचे सिनेमे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः यशराज बॅनरचा 'मेरी प्यारी बिंदू' हा सिनेमा येत्या 12 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. या सिनेमात आयुष्मान खुराणा आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. अक्षय रॉय यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहेत. भारतात इनडोअर शूटिंगसाठी यशराज स्टुडिओ अतिशय उत्कृष्ट आणि भव्य आहे. यशराज बॅनरच्या सिनेमांचा उल्लेख निघताच प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर शिफॉनच्या साड्या, ऋषी कपूरचे स्मार्ट स्वेटर, शाहरुखचा रोमान्स उभा राहतो. अभिनय आणि दिग्दर्शनाची इच्छा असलेल्यांसाठी यशराज स्टुडिओत काम करण्याची संधी मिळणे स्वप्नपूर्तीच ठरु शकते. स्टुडिओत प्रवेश करताच गणपतीचे सुंदर मंदिर लक्ष वेधून घेते.  

20 एकर परिसरात आहे यशराज स्टुडिओ
दिवंगत यश चोप्रा यांनी पाया रोवलेल्या यशराज स्टुडिओमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. वीस एकर परिसरात हा स्टुडिओ पसरलेला हा स्टुडिओ 2005 साली आकारास आला. मुंबईतील वीरा देसाई रोड (अंधेरी) वर हा स्टुडिओ उभा आहे. अनेक सिनेमे, शोजची निर्मिती या स्टुडिओत झाली आहे. एडीटींग, डबिंग, मिक्सींग अशा तांत्रिक गोष्टींपासून ते कलाकारांच्या राहण्याची उत्तम सोय या स्टुडिओत आहे. या स्टुडिओचे इंटेरिअर यूएसचे डिझायनर आर्टिन पिचहेनर यांनी डिझाइन केले आहे. हा भारतातील साउंडप्रूफ आणि एअर कंडिशन्ड स्टुडिओ आहे. यामध्ये तीन साउंड स्टेज आहेत. या स्टुडिओच्या बाहेर दररोज ऑडिशन देण्यासाठी आलेल्यांची गर्दी बघायला मिळते. पण यादीत जर नाव नसेल, तर येथे प्रवेश मिळत नाही.

या स्टुडिओत नेहमीच बॉलिवूड तारे-तारका शूटिंग करत असतात. अमिताभ बच्चन यांचा टीव्ही शो असो, किंवा सलमान, आमिरच्या सिनेमांचे भव्य सेट्स येथे उभारले जातात. या स्टुडिओत स्टार्सच्या मेकअप रुमसोबतच जीमची सुविधा उपलब्ध आहे. अनेक स्टार्स येथील जिम यूज करतात. येथील जेवण अतिशय प्रसिद्ध आहे. विशेषतः यशराज बॅनरचा सिनेमा असेल. तर येथे सिनेमाच्या थीमनुसार फूड स्टॉल उपलब्ध असतात. 

फोटो साभार - यशराज फिल्म्स...   

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला यशराज स्टुडिओची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्मध्ये पाहा डोळे दिपवणा-या यशराज स्टुडिओची खास झलक...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...