आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे राम कपूरची रिअल फॅमिली, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी केले होते LOVE MARRIAGE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राम कपूर पत्नी गौतमी, मुलगी सिया आणि मुलगा अक्ससोबत)
मुंबई- टीव्ही अभिनेता राम कपूरचा 'कुछ कुछ लोचा है' सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला आहे. सिनेमात राम कपूर विवाहित व्यक्तीची भूमिका साकारत आहे. या सिनेमात तो अभिनेत्री शनाया (सनी लिओन)वर प्रेम करतो आणि तिच्यासाठी काहीही करण्यास तयार होतो. राम कपूर रिअल लाइफमध्येसुध्दा विवाहित आहे आणि त्याला आपली पत्नी गौतमी खूप प्रेम आहे.
गौतमी टीव्ही अभिनेत्री आहे. दोघांची भेट 2000 ते 2002मध्ये प्रसारित झालेल्या 'घर एक मंदिर' मालिकेवेळी झाली. ही मालिका ऑफ एअर झाली मात्र दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. 14 फेब्रुवारी 2003 रोजी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दोघे लग्नगाठीत अडकले. जून 2006मध्ये राम आणि गौतमी यांना मुलगी सिया आणि 2009मध्ये मुलगा अक्स झालेत.
रामच्या प्रमुख मालिका-
1997पासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून काम करत आहे. त्याला सर्वात पहिला ब्रेक आणि लोकप्रियता 2000मध्ये आलेल्या 'घर एक मंदिर' मालिकेतून मिळाली. त्याने ‘कसम से (2006) आणि 'क्योकि सास भी कभी बहू थी' (2007)सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
या सिनेमांमध्ये केले आहे काम-
'मानसून वेडिंग' (2000), 'हजारो ख्वाहिशे ऐसी' (2003), 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' (2010), 'उडान' (2010), 'एक मै और एक तू' (2012), 'एजेन्ट विनोद' (2012), 'स्टूडेंट ऑफ द ईअर' (2012), 'मेरे डॅड की मारुती' (2013), 'शादी के साइड इफेक्ट्स' (2014), 'हमशकल्स' (2014)सारख्या सिनेमांमध्येही राम झळकला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पत्नी आणि मुलींसोबतची राम कपूरची छायाचित्रे...