आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Rani Mukherjee Aditya Chopra 1st Wedding Anniversary

Anniversary: राणीने गुपचुप केले होते लग्न, रिसेप्शनला अनुपस्थित होत्या कजिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- उजवीकडे आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी आणि डावीकडे काजोल आणि तनिषा मुखर्जी)
मुंबई- अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्या लग्नाला एक वर्षे पूर्ण झाले आहे. राणी आणि आदित्यने 21 एप्रिल 2014 रोजी इटली येथे गुपचुप लग्न केले होते. हा एक खासगी समारंभ होता. त्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे काही लोक उपस्थित होते. लग्नानंतर यशराज फिल्म्सच्या माध्यमातून आधिकारिकरित्या दोघांनी लग्नाची घोषणा केली होती.
इटलीमध्ये गुपचुप लग्न केल्यानंतर, आदित्य आणि राणीने मुंबईमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत किरन आणि अनुपम खेर, करन जोहर आणि त्याची आई हिरु जोहर, गायक नितिन मुकेश आणि रानीचे कुटुंबीय सामील झाले होते. परंतु एक आश्चर्याची गोष्ट अशी, की राणीची कजिन काजोल आणि तनिषा मुखर्जी या पार्टीत सामील झाल्या नव्हत्या. शिवाय शाहरुख आणि आमिरसारखे स्टार्स जे राणीचे जवळचे मित्र आहेत, तेदेखील या पार्टीत आले नव्हते.
राणी मुखर्जीचा पती आणि यशराज फिल्म्सचे चेअरमन आदित्य चोप्रा, नेहमी माध्यमे, कॅमेरा आणि चाहत्यांपासून दूरावा ठेवतो. त्यामुळेच राणी आणि आदित्य यांचे नाते कधीच पब्लिकली झाले नाही. दोघे कधी सोबत दिसले देखील नाही. परंतु राणीची, चोप्रा कुटुंबीयांसोबत चांगली बाँडिंग आहे. अनेक निमित्तांवर राणी, चोप्रा कुटुंबातील सदस्य दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा (आदित्यचे वडील), पामेला चोप्रा (आदित्यची आई) आणि उदय चोप्रा (आदित्यचा धाकटा भाऊ) यांच्यासोबत वेळ घालवाना दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राणी मुखर्जीचे चोप्रा कुटुंबीयांसोबतचे PHOTOS...