(अंजू भवनानी आणि शेफाली शाहसोबत अभिनेता रणवीर सिंह)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला आणि झोया अख्तर दिग्दर्शित 'दिल धडकने दो' हा सिनेमा येत्या शुक्रवारी (5 जून) रिलीज होतोय. एक्सेल एन्टरटेन्मेंट बॅनरचा हा सिनेमा कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला आहे. याची कहाणी मेहरा कुटुंबाच्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे. सिनेमात रणवीरने कबीर मेहरा ही भूमिका वठवली आहे. प्रियांका चोप्रा त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असून अनुष्का शर्मासोबत पडद्यावर तो रोमान्स करताना दिसणारेय. सिनेमात त्याच्या आईवडिलांच्या भूमिकेत शेफाली शाह आणि अनिल कपूर आहेत.
आता हे झाले रणवीरच्या ऑनस्क्रिन कुटुंबाविषयी. खासगी आयुष्यातसुद्धा रणवीर
आपल्या कुटुंबीयांशी खूप जवळ आहे. रणवीरच्या कुटुंबात त्याची बहीण, आईवडील आणि गर्लफ्रेंड आहे. रिअल लाइफमध्ये त्याचे हे छोटे कुटुंब आहे.
झोयाच्या या सिनेमात रणवीर सिंहच्या आईच्या भूमिकेत शेफाली शाह आहे. तर खासगी आयुष्यात त्याच्या आईचे नाव अंजू भवनानी आहे. रणवीर आपल्या आईवर जीवापाड प्रेम करतो. त्याने आपल्या आईला सरप्राइजच्या रुपात मर्सिडिज कार गिफ्ट म्हणून दिली आहे. रणवीर mamma's boy असल्याचे म्हटले जाते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, रणवीरच्या रिल आणि रिअल फॅमिलीविषयी...