आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: Sajid Nadiadwala And Divya Bharti Wedding

B\'day: गोविंदाने करून दिली होती साजिद-दिव्याची भेट, गुपचुप थाटले होते लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- साजिद नाडियाडवाला आणि दिव्या भारती)
मुंबई- बॉलिवूडचा प्रसिध्द निर्माता साजिद नाडियाडवाला आज 49 वर्षांचा झाला आहे. 18 फेब्रुवारी 1966 रोजी जन्मलेल्या साजिदने गेल्यावर्षी 'किक' सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
साजिदने 1992मध्ये 'जुल्म की हुकूमत' निर्मित केला होता, त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने आतापर्यंत डझनबर सिनेमे केले आहेत. त्यामध्ये 'वक्त हमारा है', 'जीत', 'जुडवां', 'हर दिल जो प्यार करेगा', 'मुझसे शादी करोगी', 'हे बेबी', 'हीरोपंती', '2 स्टेट्स'सारखे सिनेमे सामील आहेत. त्याच्या प्रॉडक्शनमध्ये 'फँटम', 'तमाशा', 'हाऊसफुल 3' सिनेमा तयार होत आहेत.
दिव्या भारतीसोबत झाले लग्न-
साजिदची आणखी एक ओळख अभिनेत्री दिव्या भारतीचा पती असल्याचीसुध्दा आहे. दिव्या साजिदची भेट 'शोला और शबनम' सिनेमाच्या सेटवर झाली होती. गोविंदाने सिनेमाच्या सेटवर दिव्या आणि साजिद यांची ओळख करून दिली होती. त्यानंतर साजिद दररोज दिव्याला भेटायला सेटवर येत होते. कारण साजिद दिव्यावर एकतर्फी प्रेम करत होते. हळू-हळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दिव्यालाही साजिदवर प्रेम झाले.
त्यानंतर दोघांनी 10 मे 1992मध्ये गुपचुप पध्दतीने लग्न करून संसार थाटला. दोघांच्या लग्नावेळी दिव्याची मैत्रीण आणि हेअर ड्रेसर संध्या उपस्थित होती. मात्र लग्नाच्या एक वर्षानंतर 5 एप्रिल 1993मध्ये दिव्याचा इमारतीवरून खाली कोसळून मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला आजही अपघात मानला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साजिद आणि दिव्या भारती यांची सोबतची काही छायाचित्रे...