आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO@B\'DAY: सनी नव्हे करणजीत कौर वोहरा आहे खरे नाव, बालपणी दिसायची अशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सनी लिओन)
मुंबईः पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनने आज वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. सनीचा जन्म 13 मे 1981 मध्ये कॅनडातील सर्निया ओंटारिया येथे पंजाबी कुटुंबात झाला. सनीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे. अॅडल्ट करिअरमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने आपले नाव सनी ठेवले.
बातम्यांनुसार, अॅडल्ट सिनेमांमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने आपले खरे नाव सनीच असल्याचे सांगितले होते. तर लिओन हे आडनाव पेंटहाउस मॅगझिनचे माजी संस्थापक बॉब गुसियोन यांच्या नावावरुन घेतले. बालपणी अॅथलेटिक्स होती आणि मुलांसोबत हॉकी खेळणे तिला पसंत होते. पब्लिक स्कूलमध्ये जाणे तिला सुरक्षित वाटत नव्हते, म्हणून कॅथलिक शाळेत तिला प्रवेश देण्यात आला.
पोर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सनी एका जर्मन बेकरीत कामाला होती. सनीने एका मुलाखतीत सांगितले होते, की 2011 मध्ये ती डेनियल वेबरसोबत विवाहबद्ध झाली. सनीने बॉलिवूडमध्ये आपले बस्थान बसवले असून आता तिचे पती डेनियलसुद्धा बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहेत. 'डेंजरस हुस्न' हे त्यांच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाचे नाव आहे.
'बिग बॉस'नंतर झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री
सनीने 2011 मध्ये कलर्स वाहिनीच्या 'बिग बॉस' या वादग्रस्त शोच्या पाचव्या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. येथून तिला बॉलिवूडची दारं उघडी झाली. या शोच्या एका एपिसोडमध्ये महेश भट्ट पाहुणे म्हणून आले होते. येथेच त्यांनी सनीला त्यांच्या सिनेमाची ऑफर दिली. मात्र सनीचा पदार्पणातला सिनेमा फ्लॉप ठरला. 'जिस्म 2' या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र हळूहळू सनी येथे स्थिरावली. 'जिस्म 2' (2012), 'जॅकपॉट' (2013), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'एक पहेली लीला' (2015), 'कुछ-कुछ लोचा है' (2015) हे सनीचे सिनेमे आहेत. सध्या ती 'मस्तीजादे', 'टीना और लोलो' आणि 'वन नाइट स्टँड' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
Divyamarathi.com तुम्हाला सनी लिओनची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे दाखवत आहे. ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...