आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्युमेंट्रीमधून उलगडणार सनीच्या भूतकाळातील अनेक रहस्य, जाणून घ्या का बदलले नाव?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सनी लियोनी
मुंबई- पोर्न स्टारपासून बॉलिवूड अभिनेत्री झालेली सनी लिओनच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच जगभरात रिलीज होणार आहे. फिचर फिल्मसारख्या या डॉक्युमेंट्रीमधून सनीचा भूतकाळ उलगडणार आहे. ही डॉक्युमेंट्री पत्रकार दिलीप मेहता यांनी तयार केली आहे. दिलीप यांच्या सांगण्यानुसार, ही डॉक्युमेंट्री एका अशा महिलेची कहाणी आहे, जिला आपल्या भूतकाळामुळे मान खाली घालावी लागत नाहीये. असो, हे झाले डॉक्युमेंट्रीविषयी, आता एक नजर टाकूया सनीच्या रिअल लाइफवर...
करनजीत कौर वोहरा आहे खरे नाव-
सनी लिओनचा जन्म 13 मे 1981ला सर्निया ओंटारियो, कॅनाडामध्ये पंजाबी शिख कुटुंबात झाला. तिचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे. अॅडल्ड करिअर निवडल्यामुळे तिचे नाव सनी ठेवण्यात आले.
आडनावामागे काय आहे रहस्य-
अॅडल्ड सिनेमांत एंट्री केल्यानंतर तिने सांगितले सांगितले होते, की सनी तिचे खरे नाव आहे. परंतु लिओन आडनाव तिने पेंटहाऊस मासिकाचे माजी मालक बॉब गुसियोन यांच्या नावावरून घेतले.
कॅथोलिक स्कूलमध्ये घेतला होता प्रवेश
बालपणी सनी एथलेटिक्स होती आणि मुलांसोबत हॉकी खेळायची. पब्लिक स्कूलमध्ये जाणे तिच्यासाठी सुरक्षित नव्हते, असे सांगितले जाते. त्यामुळे तिने कॅथोलिक शाळेत प्रवेश घेतला होता.
अॅडल्ड सिनेमांत येण्यापूर्वी-
पोर्न इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी सनी एक जर्मन बेकरीमध्ये काम करत होती. सनीने एका मुलाखतीत सांगितले होते, की डेनिअल वेबरसोबत तिचे लग्न 2011मध्ये झाले. सनीनंतर डेनिअलनेसुध्दा सिनेमांत एंट्री करणार आहे. त्याचा पहिला सिनेमा 'डेंजरस हुस्न' असेल, या सिनेमाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाहीये.
'बिग बॉस'मध्ये आल्यानंतर मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री-
सनी लिओनने 2011मध्ये कलर्स चॅनलवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या 5व्या पर्वात वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. येथून तिच्यासाठी बॉलिवूडचे दार खुले झाले. शोच्या एका एपिसोडदरम्यान दिग्दर्शक महेश भट्ट शोमध्ये पाहूणे म्हणून आले होते आणि सनीला 'जिस्म 2' सिनेमासाठी निवडले. तिचे पदार्पण यशस्वी ठरले नाही, मात्र सनीचे बॉलिवूड करिअर सुरुच आहे.
'रागिनी एमएमएस 2' पहिला यशस्वी बॉलिवूड सिनेमा-
सनी लिओनने 'कुछ कुछ लोचा है'(2015), 'एक पहेली लीला'(2015), 'जिस्म 2' (2012), 'जॅकपॉट' (2013) आणि 'रागिनी एमएमएस 2'सारख्या सिनेमांत काम केले आहे. 2014मध्ये रिलीज झालेला 'रागिनी एमएमएस 2' तिचा पहिला यशस्वी सिनेमा ठरला. तिचा 'मस्तीजादे', 'टीना और लोलो' आणि 'वन नाइट स्टँड'सुध्दा रिलीजची प्रतिक्षा करत आहेत.
divyamarathi.com आज तुम्हाला सनी लिओनची काही निवडक छायाचित्रे दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...
बातम्या आणखी आहेत...