आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांत इतकी बदलली शाहरुखच्या 'कल हो न हो'मधील 'जिया', पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे झनक, उजवीकडे 'कल हो न हो' सिनेमाच्या एका सीनमध्ये शाहरुखसोबत झनक
2003मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो न हो' सिनेमा आजही अनेकजण मोठ्या आवडीने पाहतात. शाहरुख खान स्टारर या सिनेमातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेषत: प्रिती झिंटाची धाकटी बहीण जियाचे पात्र साकारणारी क्युट मुलगी तुम्हाला आठवतच असेल. परंतु आता ही क्युट गर्ल मोठी झाली असून 12 वर्षांनी ग्लॅमरस दिसत आहे. तिने खरे नाव आहे झनक शुक्ला.
'कल हो न हो'मधून मिळाली ओळख-
24 जानेवारी 1996ला जन्मलेली झनक प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री सुप्रिया शुक्ला आणि डॉक्युमेंट्री फिल्ममेकर हरी शुक्ला यांची मुलगी आहे. 'कल हो न हो'पूर्वी झनक 'सोनपरी' आणि 'करिश्मा का करिश्मा'सारख्या लोकप्रिय मालिकांत झळकली होती. परंतु सिनेमातील प्रितीची धाकची बहीण जिया कपूरच्या भूमिकेने तिला मोठे यश मिळवून दिले.
‘ब्लॅक’ सिनेमाची मिळाली होती ऑफर-
2005मध्ये रिलीज झालेल्या 'ब्लॅक' सिनेमात जी भूमिका आएशा कपूरने साकारली आहे, ती आधी झनकला ऑफर झाली होती. परंतु शूटिंगमध्ये लागणा-या जास्त वेळामुळे झनकने हा सिनेमा सोडून दिला. या सिनेमा आएशाचा उत्कृष्ट सहायक अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
झनकला सुरु करायचे आहे NGO-
पदवी शिक्षण घेत असलेल्या झनकला सोशल अॅक्टिव्हिस्ट व्हायचे आहे आणि स्वत:ची NGO सुरु करायची आहे.
सोशल मीडियावर असते अॅक्टिव्ह-
18 वर्षांची झनक सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते. इंस्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा झनकचे निवडक ग्लॅमरस फोटो...
बातम्या आणखी आहेत...