मुंबईः बच्चन घराण्याची सूनबाई ऐश्वर्याने मुंबईत नुकताच नवीन आशियाना खरेदी केल्याची बातमी आहे. मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये तिचा हा नवीन फ्लॅट असून तो तिने तब्बल 21 कोटींत खरेदी केला आहे.
बीकेसीतल्या 'सिग्निया आयल्स'मध्ये साडे पाच हजार चौ. फुटात तिचा हा नवीन फ्लॅट असून त्यामध्ये तीन बेडरुम, किचन, हॉल, स्विमिंग पूल आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लक्झरी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन गेल्याच आठवड्यात झाले. 38,000 रु. प्रति चौ.फूट अशा दराने खरेदी-विक्रीचा हा व्यवहार झाला आहे. सनटेक रियल्टीचे सिग्नेचर आयलंड, सिग्निया आयल्स आणि सिग्निया पर्ल असे तीन टॉवर्स आजूबाजूला आहेत. त्यातल्या सिग्निया आयल्समध्ये ऐश्वर्याचा फ्लॅट आहे.
अलीकडेच अभिनेत्री सोनम कपूर हिने सिग्नेचर आयलंडमध्ये ड्युप्लेक्स अपार्टमेण्ट खरेदी केले आहे. 7000 चौ.फुटांच्या या ड्युप्लेक्स अपार्टमेंटसाठी सोनमने 35 कोटी मोजले.
ऐश्वर्याने गुंतवणूक म्हणून हा फ्लॅट खरेदी केला आहे. ऐश्वर्याप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी जुहू, अंधेरी, वांद्रा या पॉश परिसरांमध्ये गुंतवणूक म्हणून प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
ऐश्वर्याने खरेदी केलेल्या नवीन फ्लॅटचे सॅम्पल फोटोज आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कसा आहे ऐश्वर्याचा नवीन आशियाना...