(फोटो- (वर)- फावल्या वेळेत झोप घेताना रणवीर सिंह आणि सोबत अन्य. (खाली) - झोया अख्तरचा आशीर्वाद घेताना रणवीर सिंह)
बॉक्स ऑफिसवर आज झोया अख्तरचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित दिल धडकने दो हा सिनेमा रिलीज झाला. विखुरलेल्या कुटुंबावर आधारित या सिनेमाची कथा आहे. रणवीर सिंह,
प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, शेफाली शाह, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर, राहुल बोस ही तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. कामाचे दडपण न घेता अगदी धमाल-मस्तीत या सर्व सेलिब्रिटींनी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले.
'दिल धडकने दो' या सिनेमाची कहाणी मेहरा कुटुंबावर आधारित आहे. मेहरा कुटुंब हे विखुरलेले कुटुंब आहे. या श्रीमंत कुटुंबातील अनिल कपूर, शेफाली शाह, रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा सदस्य आहेत. वैचारिक मतभेदांमुळे छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्यांच्यात भांडण होतात. एकेदिवशी हे संपूर्ण कुटुंब पाण्याच्या जहाजावर सफारीवर निघतात. येथून सिनेमाची कथा पुढे सरकते. हे विखुरलेले कुटुंब कसे एकत्र होतं या थीमवर सिनेमा आधारित आहे. रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्राने बहीणभावाची भूमिका या सिनेमात वठवली आहे.
आज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. याचेच औचित्य साधत आम्ही तुम्हाला सिनेमाच्या सेटवरील सेलिब्रिटींची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, शूटिंग सेटवर कशी चालायची या सेलेब्सची धमाल...