आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pictures Of Shahid Kapoor And Meera’S Sea Facing Apartment In Juhu

या Sea Facing अपार्टमेंटमध्ये झाला मीराचा गृहप्रवेश, पाहा शाहिदच्या नवीन आशियानाची झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडे - शाहिदचे जुहूस्थित सी फेसिंग घर, उजवीकडे - शाहिद आणि मीरा)

मुंबईः 7 जुलै रोजी लग्नबेडीत अडकलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने मीरा राजपूत हिच्यासोबत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. मुळची दिल्लीची असलेल्या मीराचा लग्नानंतर शाहिदच्या मुंबईतील जुहूस्थित नवीन घरात गृहप्रवेश झाला आहे. याच घरात दोघांनी आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली आहे.
शाहिदने गेल्यावर्षी मुंबईतील जुहू परिसरात एक सी फेसिंग फ्लॅट खरेदी केला. यावर्षी एप्रिल महिन्यात फ्लॅटच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे या नवीन घराचे इंटेरियर शाहिदची पत्नी मीराच्या पसंतीचे आहे. तिनेच ही जबाबदारी सांभाळली होती. ती वेळोवेळी येऊन फ्लॅटच्या इंटेरियरच्या कामाकडे जातीने लक्ष देत होती.
शाहिदचा जुहूस्थित फ्लॅट हा प्रणेता अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरवर आहे. 1000 चौ. फुटात हा फ्लॅट आहे. या अपार्टमेंटसमोर बीच आहे.
अभिनेत्री विद्या बालनचाही फ्लॅट याच अपार्टमेंटमध्ये आहे. 14 कोटींचा हा फ्लॅट विद्याला तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी भेट म्हणून दिला आहे.
पुढे पाहा, शाहिद-मीराच्या सी फेसिंग अपार्टमेंटची खास झलक...