आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pictures Of Shahid Kapoor’S Sea Facing Apartment

या आलिशान अपार्टमेंटमध्ये आहे शाहिद कपूरचे घर, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[प्रणेता अपार्टमेंट]
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आज मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. शाहिदने गेल्यावर्षी मुंबईतील जुहू परिसरात एक सी फेसिंग फ्लॅट खरेदी केला. एप्रिल महिन्यात फ्लॅटच्या नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. या घराच्या इंटेरियरची जबाबदारी शाहिदची भावी पत्नी मीरा राजपूतने सांभाळली होती अशी बातमी मागील दिवसांत ऐकिवात होती. शाहिद आणि मीराचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला त्यानंतर याचा खुलासा झाला.
आज लग्नगाठीत अडकणारे शाहीद आणि मीरा याच फ्लॅटमध्ये वास्तव्याला येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घराचे इंटेरियर मीराच्या पसंतीचे आहे. वेळोवेळी ती फ्लॅटचे डिझाइन बघण्यासाठी तेथे येत असते. इतकेच नाही तर मीराचे भावी सासरे आणि शाहिदचे वडील पंकज कपूरसुद्धा तिला या कामात मदत करत आहेत. तेदेखील अधूनमधून तेथे जात असतात.
शाहिदचा जुहूस्थित फ्लॅट हा प्रणेता अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरवर आहे. 1000 चौ. फुटात हा फ्लॅट आहे. या अपार्टमेंटसमोर बीच आहे. अभिनेत्री विद्या बालनचाही फ्लॅट याच अपार्टमेंटमध्ये आहे. 14 कोटींचा हा फ्लॅट विद्याला तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी भेट म्हणून दिला आहे.
पुढे पाहा, शाहिदच्या अपार्टमेंटची खास छायाचित्रे...