आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुच्या आहारी गेली होती ही अॅक्ट्रेस, दारूने स्मशानात पोहोचवण्याआधीच घेतला हा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आनंद असो वा दुःख बॉलिवूडमध्ये सर्वकाही सेलिब्रेट करण्याचा ट्रेंड आहे. मग सिनमांची सक्सेस पार्टी असो वा कुणाचा बर्थडे दारु पिण्याची आणि पाजण्याची जणू येथे परंपराच आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट हिने तिला असलेल्या दारुच्या व्यसनाचा खुलासा केला. ती म्हणाली, की बॉलिवूडमध्ये जर तुमचा सिनेमा हिट झाला तर येथे शॅम्पेन उडवली जाते आणि जर सिनेमा फ्लॉप ठरला तर दुःखात दारु पिली जाते. 

वयाच्या 16 व्या वर्षी जडले दारुचे व्यसन...
सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा भटने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून दारु प्यायला सुरुवात केली होती. हळूहळू तिला हे व्यसनच जडले. वयाच्या 45 व्या वर्षी पूजाला उमगले, की आता तिने दारु सोडायला हवी, अन्यथा मृत्यू फार लांब नाही. 

68 दिवसांपासून पूजाने केला नाही दारुला स्पर्श...  
68 दिवस झाले आहेत आणि पूजा भटने दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही. 24 डिसेंबरला पूजाने दारूला कायमचा रामराम ठोकला. त्यानंतर नाताळची पार्टी, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आणि 24 फेब्रुवारीला तिचा स्वत:चा वाढदिवसही आला पण सगळे प्रसंग दारूशिवाय साजरे झाले.  

वडिलांसोबत बोलताना झाली जाणीव... 
आपला हा निर्णय केव्हा आणि कसा झाला ते पूजा सांगत होती. ती म्हणाली, 'आपल्या देशात दारूला एक कलंक मानले जाते आणि समाजाच्या भीतीने बाईचे दारू पिणे तर लपवून ठेवले जाते आणि त्यातून महिलांना बाहेर येणे कठिण जाते. मला हा विचार मिटवायचा आहे. आपण आपल्या अडचणी, आपल्याला होणारा त्रास, आपल्या चुका शेअर करत नाही. आपला कमकुवतपणा झाकून ठेवतो आणि याच गोष्टीचा पुढे कर्करोग होतो.' 
 
एकदा आपले वडील महेश भट यांच्यासोबत गप्पा मारताना ती या निर्णयापर्यंत पोहोचली. याविषयी पूजा सांगते, ''21 डिसेंबरचा दिवस होता तो. महेश भट यांनी दिल्लीहून पूजाला फोन केला आणि नंतर बराच वेळ ते देशाच्या सद्यस्थितीविषयी बोलत होते. ते देशातल्या अशा नेत्यांविषयी बोलत होते जे आपली गडगंज संपत्ती मागे ठेवून जाण्याच्या इच्छेपोटी देशात हाणामाऱ्या करून अशांती माजवत आहेत. फोन ठेवताना महेश भट तिला म्हणाले, 'आय लव यू बेटा.' उत्तरादाखल ती म्हणाली, 'आय लव यू पापा. तुमच्यापेक्षा अधिक मला जगात काही नाही.' यावर महेश भट्ट म्हणाले, 'जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर स्वत:वर प्रेम कर, कारण मी तुझ्याआतच राहतो.''
 
पूजा पुढे सांगते, ''त्यांचे ते शब्द आणि तो क्षण माझ्या मनात घर करून गेला. त्या क्षणाला मी ठरवलं की बस, या क्षणापासून मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जगेन. फोन ठेवल्यावर मी विचार करू लागली की कोणासोबत तरी बाहेर जाऊन एक बाटली व्हिस्की पिणे म्हणजे स्वत:वर प्रेम करणे? याचे उत्तर 'नाही' होते.''

पूजा म्हणते, 'मी 45 वर्षांची आहे. दारूने स्मशानात पोहोचवण्याआधी मला दारूला सोडायचे होते. मला पुढची 10 वर्षे स्वत:साठी जगायची आहेत. माझ्यातल्या चांगल्या, उजळ गुणांना बाहेर काढायचे आहे.'

पुढे वाचा, कुणासोबत झाले होते पूजाचे लग्न आणि कधी घेतला घटस्फोट... 
बातम्या आणखी आहेत...