आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोहेंजोदारो’: हृतिकच्या हीरोईनचा आला First Look, त्याचापेक्षा आहे वयाने 17 वर्षांनी लहान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मोहेंजोदारो’ या सिनेमातील हृतिक रोशन आणि पूजा हेगडेचा लूक - Divya Marathi
‘मोहेंजोदारो’ या सिनेमातील हृतिक रोशन आणि पूजा हेगडेचा लूक

मुंबईः दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या आगामी ‘मोहेंजोदारो’या सिनेमातील अभिनेत्री पूजा हेगडेचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. सिनेमातील तिच्या पात्राचे नाव असेल चानी. पोस्टरमध्ये पूजा रेड अँड ब्लू आउटफिटमध्ये दिसत आहे. एखाद्या प्रिन्सेसप्रमाणे तिचा हा लूक आहे. 25 वर्षीय पूजा हेगडे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिने यापूर्वी तामिळ आणि तेलगूतील दोन ते तीन सिनेमांत काम केले आहे. 'मोहनजो दाडो'मध्ये पूजा तिच्यापेक्षा वयाने 17 वर्षांनी मोठ्या हृतिकसोबत रोमान्स करताना दिसणारेय. येत्या 12 ऑगस्ट रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
मिस युनिव्हर्स पेजेंटमध्ये सेकंड रनरअप ठरली होती पूजा...
मुंबईत जन्मलेली आणि येथेच लहानाची मोठी झालेल्या पूजाने 2010 मध्ये मिस युनिव्हर्स पेजेंटमध्ये सहभाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धत ती सेकंड रनरअप ठरली होती. त्यानंतर 'Mugamoodi' या तामिळ सिनेमाद्वारे तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. याव्यतिरिक्त 'Oka Laila Kosam' आणि 'Mukunda' या दोन तेलगू सिनेमांमध्ये तिने अभिनय केला आहे.

आशुतोष गोवारिकरांच्या पत्नीने तिला जाहिरात पाहिले आणि ऑडीशनला बोलावले...
आशुतोष गोवारिकर यांच्या पत्नी सुनीता यांनी पूजाला एका जाहिरातीत पाहिले होते. त्यानंतर तिला ऑडीशनसाठी बोलावण्यात आले. पूजा ऑडीशनमध्ये पास झाली आणि सिनेमासाठी तिला साईन करण्यात आले. या सिनेमासाठी आता पूजाना दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. विशेष म्हणजे याचकाळात पूजाला मणिरत्नम यांच्या सिनेमाची ऑफर आली होती, मात्र 'मोहनजो दाडो'साठी तिने ती ऑफर नाकारली.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, पूजा हेगडेची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)