आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिलवाले दुल्हनिया...'मधली चुलबुली 'छुटकी' आहे सोनाक्षी सिन्हाची बहीण, आता दिसते ग्लॅमरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या ब्लॉकबस्टर सिनेमात काजोलच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारणा-या छुटकी तुम्हाला आठवतेय ना.. या सिनेमात पूजा रुपारेल या अभिनेत्रीने छुटकीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या निरागस अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली होती.


1995 मध्ये 'डीडीएलजे' सिनेमात झळकलेल्या छुटकीत आता बराच बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईत आयोजित मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा वेगळा लूक बघायला मिळाला. शिवाय पूजा अनिल कपूरच्या '24' या मालिकेत झळकली होती. सध्या पूजा आपल्या स्टँड अप कॉमेडी शो आणि स्क्रिप्ट रायटिंगमध्ये बिझी आहे. पूजाने मुंबईतील एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटीतून एम. ए. इन इंडस्ट्रीयल सायकॉलोजीत पदवी प्राप्त केली आहे.


पूजाचे कुटुंबः
पूजा रुपारेलची आई सुनीता आणि सोनाक्षी सिन्हाची आई पूनम या दोघी सख्या मावस बहिणी आहेत. म्हणजेच पूजा आणि सोनाक्षीदेखील कझिन आहेत. पूजाची थोरली बहीण भावना रुपारेल हीदेखील अभिनेत्री असून 'चल पिक्चर बनाते है' या सिनेमात ती झळकली होती. सध्या ती तेलगू सिनेमात कार्यरत आहे.


पूजाच्या लूकमध्ये झालेला बदल या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा 20 वर्षांनी कशी दिसतेय प्रेक्षकांची लाडकी 'छुटकी'...

बातम्या आणखी आहेत...