आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिटी झिंटासह या सेलिब्रिटींनीही Foreigner पार्टनरबरोबर थाटला संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मलायका अरोरा बरोबर नातं तोडल्यानंतर आता अरबाज रोमानियन गर्लफ्रेंड अॅलेक्झेंड्रा कॅमेलिया हिच्याशी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जर अरबाजने अॅलेक्झेंड्राबरोबर लग्न केले तर विदेशी पार्टनरबरोबर लग्न करणारा तो पहिला अॅक्टर असेल असे नाही. यापूर्वीही अनेक बॉलीवूड अॅक्टर-अॅक्ट्रेसेनी विदेशी पार्टनरची निवड केली आहे.
 
यांनीही थाटला विदेशींबरोबर संसार
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अॅक्टर शशी कपूर आणि कबीर बेदी यांच्याबरोबर प्रिती झिंटा, सेलिना जेटली, रीना रॉय, कश्मिरा शहा, सुचित्रा पिल्लई आणि किम शर्मा अशा सेलेब्सनीही फॉरेनर्सबरोबर संसार थाटला आहे. त्यांच्याबाबत आपण या पॅकेजमधून जाणून घेणार आहोत.
प्रिटी झिंटा-जीन गुडइनफ
प्रिती झिंटाने अमेरिकन सिटीझन जीन गुडइनफबरोबर 29 फेब्रुवारी 2016 रोजी लग्न केले. लॉस एंजल्समध्ये एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला होता. जीन लॉस एंजल्मध्ये राहत असून, तो फायनांशियल अॅनालिस्ट आहे.
कश्मिरा शहा-ब्रॅड लिस्टरमॅन
कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहाने 2002 मध्ये अमेरिकन इनव्हेस्टमेंट बँकर आणि प्रोड्युसर ब्रॅड लिस्टरमॅनबरोबर लग्न केले होते. त्यांचे नाते 6 वर्षे टिकले. 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2013 मध्ये कश्मिराने गोविंदाचा भाचा कृष्णाबरोबर विवाह केला.
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, विदेशींनी लाईफ पार्टनर बनवलेल्या इतर काही सेलेब्रिटींबाबत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...