मुंबईः अभिनेते अमिताभ बच्चन यांची लाकडी लेक श्वेता बच्चन नंदा हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. श्वेताचा जन्म 17 मार्च 1974 रोजी झाला. फिल्मी बँकग्राऊंड असलेल्या कुटुंबातून असूनदेखील श्वेता बॉलिवूडपासून दूर राहिली, मात्र पेज थ्री पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये ती नेहमी दिसत असते. श्वेता एक ब्लॉगर असून तिने सीएनएन आयबीएन चॅनलमध्ये जर्नलिस्ट म्हणून काम केले आहे. रणबीर कपूरचा आतेभाऊ निखिल नंदासोबत 1997 मध्ये श्वेताचे लग्न जाले. तिला नव्या नवेली आणि अगस्त्य ही दोन मुले आहेत.
या स्टार डॉटर्ससुद्धा राहिल्या सिनेमांपासून दूर...
श्वेताच नव्हे तर अनेक फिल्म स्टार्सच्या मुलींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. रिद्धिमा साहनी, रिया कपूर, शाहीन भट, सुझान खान, सबा खान, आहना देओल, लैला खान अशी अनेक नावे आहेत, ज्या बॉलिवूडच्या नावाजलेल्या सेलिब्रिटींच्या मुली ज्यांनी अभिनयात पदार्पण न करता दुस-या क्षेत्रात स्वतःचे नाव मोठे केले आहे.
रिद्धिमा कपूर
ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची लेक रिद्धिमा कपूर साहनी इंटेरिअर आणि फॅशन डिझायनर आहे. तिची स्वतःची ज्वेलरी लाइनसुद्धा आहे. आई नीतू सिंहसोबत तिने अनेक फोटोशूट्ससुद्धा केले आहेत. 2006 मध्ये रिद्धिमा तिचा बालपणीचा मित्र आणि बिझनेसमन भारत साहनीसोबत विवाहबद्ध झआली. तिला समारा नावाची एक मुलगी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशा आणखी काही स्टार डॉटर्सविषयी ज्यांनी सिनेसृष्टीत नव्हे तर दुस-या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.