आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक बच्चन, रणबीर कपूरसह या सेलेब्सच्या बहिणींनी फिल्म इंडस्ट्रीत केली नाही एंट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाने अलीकडेच एका प्रसिध्द वर्तमानपत्रात कॉलम लिहून सांगितले, की ती का अभिनय क्षेत्रात आली नाही. श्वेताच्या सांगण्यानुसार, 'शाळेत असताना मी काही नाटकांमध्ये काम केले होते. मात्र अभिनयाकडे करिअर म्हणून बघावे, असा खास अनुभव कधीच मला आला नाही. शाळेच्या नाटकात मी हवाइयन मुलीची भूमिका साकारली होती. क्लायमॅक्समध्ये मी माझा शेवटचा शॉटच विसरुन गेली होती. तो अतिशय वाईट अनुभव होता.' श्वेता एक ब्लॉगर आहे आणि तिने जर्नालिस्ट म्हणूनसुध्दा काम केले आहे.
या स्टार्स डॉटर्ससुध्दा राहिल्या सिनेमांपासून दूर...
सिनेसृष्टीत काम न करणारी श्वेता एकटीच अशी स्टार डॉटर नाहीये, अनेक बॉलिवूडच्या स्टार्सच्या मुलींनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले नाहीये. रिद्धीमा साहनी, रिया कपूर, शाहीन भट, सुझान खान, सबा खान, आहना देओल आणि लैला खान आणि अलविरा अग्निहोत्रीसह अनेक स्टार्स डॉटर्स आहेत, ज्यांनी दुस-या करिअरची निवड करून वेगळी ओळख मिळवली.
रिद्धीमा कपूर साहनी...
ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची लेक रिद्धिमा कपूर साहनी इंटेरिअर आणि फॅशन डिझायनर आहे. तिची स्वतःची ज्वेलरी लाइनसुद्धा आहे. आई नीतू सिंहसोबत तिने अनेक फोटोशूट्ससुद्धा केले आहेत. 2006 मध्ये रिद्धिमा तिचा बालपणीचा मित्र आणि बिझनेसमन भारत साहनीसोबत विवाहबद्ध झाली. तिला समारा नावाची एक मुलगी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सिनेमांपासून दूर राहिलेल्या स्टार्स डॉटर्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...