आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACTS: साधना घाणेकर अशा बनल्या साधना सरगम, वयाच्या 43 वर्षीही मिळाला नाही जोडीदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’ या गीताने 90 च्या दशकात धूम केली. हे गीत गाणाऱ्या साधना घाणेकर अर्थात साधना सरगम यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत. ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ गाण्यांतून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या साधना या दाभोळच्या मराठी मुलीने तब्बल 34 भाषांत गीते गायली. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहेमानपर्यंत प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले. उदित नारायण यांच्यासोबत 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमातील गाजलेले गाणे ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायन सुरु केले होते. वयाच्या चौथ्या वर्षी साधना यांनी सवाई गंधर्व म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गाणे सादर केले होते. चार दशकाच्या करिअरमध्ये गोड गळ्याच्या साधना यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

आत्तापर्यंत 15 हजारांहून अधिक गाण्यांना दिलाय स्वरसाज...  

1982 मध्ये रिलीज झालेल्या 'विधाता' या सिनेमातील 'सात सहेलियां खडी खडी' हे गाणे गाऊन साधना यांनी बॉलिवूडमध्ये सिंगिंग डेब्यू केले होते. त्यांनी आत्तापर्यंच 34 भाषांमध्ये 15 हजारांहून अधिक गाणी दायली आहे. साधना 6 वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ हे बोल असलेले गीत गायले होते. हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते.  साऊथ इंडियन गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळवणा-या साधना पहिल्या नॉन साऊथ इंडियन सिंगर आहेत.  


साधना यांच्या मातोश्री होत्या क्लासिकल सिंगर 
साधना यांचा जन्म महाराष्ट्रातील दाभोळ येथे 7 मार्च, 1974 रोजी झाला.  साधना सरगम यांचे खरे नाव साधना पुरुषोत्तम घाणेकर आहे. बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि म्युझिक टीजर होत्या.  नीला यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. तर अनिल संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. त्यांनीच साधना यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती.  त्यानंतर साधना यांनी 1978 मध्ये आलेल्या फिल्म 'तृष्णा'साठी कोरस गायले होते. त्या गाण्याचे बोल होते 'पम परम पम बोले जीवन की सरगम'. या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरसाज चढवला होता. त्यानंतर साधना यांनी वयाच्या 7 व्या वर्षीपासून पंडित जसराज  यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. 


पुढील स्लाईडमध्ये वाचा, वयाच्या 43 व्या वर्षीही अद्याप अविवाहित आहेत साधना सरगम...

बातम्या आणखी आहेत...