आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Popular Tv And Bollywood Celebs Who Committed Suicide?

'आनंदी'पूर्वी या 11 बॉलिवूड आणि TV सेलिब्रिटींनी केलीये आत्महत्या, जाणून घ्या काय होते कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्युषा बॅनर्जी, सिल्क स्मिता - Divya Marathi
प्रत्युषा बॅनर्जी, सिल्क स्मिता

मुंबईः प्रसिद्ध टीव्ही शो बालिका वधूमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 1 एप्रिल रोजी घडली. मीडिया रिपोर्ट्स आणि प्रत्युषाच्या फ्रेंड्सनुसार बॉयफ्रेंड राहुल राज सिंहने प्रेमात दगा दिल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. असे म्हटले जाते, की राहुलचे दुस-याच तरुणीशी प्रेमाचे संबंध होते, याची कुणकुण प्रत्युषाला लागली होती. मृत्यूच्या आदल्या दिवशी प्रत्युषाचे राहुलसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आपली जीवनयात्रा संपवली. अनेक सेलिब्रिटींनी उचलेले टोकाचे पाऊल...

प्रत्युषापूर्वी बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून या जगाचा कायमचा निरोप घेतला. कुणी प्रेमात मिळालेला दगा पचवू शकले नाहीत, तर कुणी करिअरमधील अपयशाला सामोरे जाऊ शकले नाहीत. एक नजर टाकुया या सेलिब्रिटींवर...
सिल्क स्मिता
दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध आणि बोल्ड अभिनेत्री सिल्क स्मिताने 3 सप्टेंबर 1996 रोजी चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत सापडली होती. तिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. बॉलिवूडमध्ये विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर' सिनेमात सिल्कची भूमिका साकारली होती. असे म्हटले जाते, की अभिनेत्री आणि पार्श्वगायिका म्हणून सिल्क स्मिताने भरपूर संपत्ती जमवनली होती. एका जवळच्या मित्राने तिला निर्माती बनून सिनेमे बनवण्याचा सल्ला दिला. तिच्या पहिल्याच दोन सिनेमांना दोन कोटींचा फटका बसला. निर्माती म्हणून तिचा तिसरा सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. सततच्या अपयशामुळे ती मानसिक तणावाखाली आली होती. त्यामुळे तिने आत्महत्या करुन जगाचा निरोप घेतला.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, इतर सेलिब्रिटींविषयी...