आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर व्हायरल झाले 'बाहुबली 2'च्या सेटचे हे Leaked Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सोशल मीडियावर सध्या काही फोटोज व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेले हे फोटोज 'बाहुबली' या सिनेमाचा सिक्वेल असलेल्या 'बाहुबली: द कन्क्लुजन' या सिनेमाच्या सेटवरील असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग आंध्र प्रदेशातील रायलसीमा येथे सुरु आहे. दिग्दर्शक एस.एस राजामौली यांनी सिनेमाविषयीची गुप्तता बाळगण्यासाठी सेटवर मोबाईलवरसुद्धा बंदी घातली होती. सिनेमाचा क्लायमॅक्स लीक होऊ नये, यासाठी तब्बल चार क्लायमॅक्स शूट करण्यात आले आहे. एवढी गुप्तता बाळगूनदेखील सिनेमाच्या सेटवरील फोटोज लीक झाले आहेत, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यापूर्वी बाहुबली हा सिनेमासुद्धा रिलीजपूर्वी लीक झाला होता.

पुढील वर्षी रिलीज होणार 'बाहुबली 2'...
एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली 2' हा सिनेमा पुढील वर्षी 17 एप्रिल रोजी रिलीज होणारेय. या सिनेमात प्रभास, राणा डग्गुबती, अमिषा शेट्टी, राम्या कृष्णन आणि सत्याराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा 'बाहुबली-2' च्या सेटचे LEAKED PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...