आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेबी बंपसोबत करीनाने केले खास फोटोशूट, पुढच्या महिन्यात होणारेय डिलिव्हरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः प्रेग्नेंसीच्या काळात जास्तीत जास्त महिला विश्रांती घेताना दिसतात. मात्र अभिनेत्री करीना कपूर खान याला अपवाद ठरली आहे. अवघडलेल्या अवस्थेतही करीना दररोज शूटिंग करतेय. अलीकडेच तिने मेहबूब स्टूडिओत एका मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेल्या या फोटोशूटच्या वेळी करीना व्हाइट मॅक्सीत दिसली होती. यावेळी तिचे बेबी बंप स्पष्ट दिसले. मीडिया रिपोर्टनुसार करीनाची ड्यू डेट 4 डिसेंबर आहे. 2012 मध्ये झाले होते सैफ-करीनाचे लग्न...
सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 रोजी त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह आहे. 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या करीनाचे शाहिद कपूरसोबत बरेच दिवस अफेअर होते. मात्र नंतर तिच्या आयुष्यात सैफ अली खानची एन्ट्री झाली. सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता यांना दो मुले (मुलगी सारा आणि मुलगा अब्राहम) आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, करीनाने प्रेग्नेंसीच्या काळात केलेल्या फोटोशूट Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...