आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या लीजाने मॅग्झिनच्या कव्हर पेजसाठी फ्लॉन्ट केले बेबी बंप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅग्झिनच्या कव्हर पेजवर बेबी बंप फ्लॉन्ट करणारी लीजा. - Divya Marathi
मॅग्झिनच्या कव्हर पेजवर बेबी बंप फ्लॉन्ट करणारी लीजा.
 
मुंबई - अॅक्ट्रेस लीजा हेडनने ती प्रेग्नंट असल्याचे जाहीर करायचा चार महिने झाले आहेत. सध्या ती हा काळ एन्जॉय करत असली तरीही कामापासून दूर गेलेली नाही. लीजाने नुकतेच एका मॅगझिनसाठी बिकिनी फोटोशूट केले आहे. त्यात ती टू पीस मल्टी कलर बिकिनीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. लीजाने या कव्हर फोटोला इन्स्टाग्रामवरही शेयर केले आहे. काही दिवसांपूर्वी लीजाने बाथटबचा एक फोटो शेयर केला होता. त्यात ती टबमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. 
 
6 महिन्यांपूर्वी केले होते लग्न 
लीजा हेडनने 29 ऑक्टोबर 2016 ला बॉयफ्रेंड डिनो ललवानीबरोबर लग्न केले होते. लीजा आणि डिनो गेल्या दीड वर्षापासून डेटींग करत होते. त्यानंतर दोघांनी थायलंडच्या फुकेटमधील अमनपुरी बीच रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. लीजाने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केले होते. लीजाचा पती डिनो पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. 

या चित्रपटांत केले आहे काम 
लीजा अखेरची 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये झळकली होती. त्याशिवाय लीजा बॉलिवूडमध्ये 'आयेशा', 'रास्कल', 'क्वीन', 'द शौकिन्स', 'संता बंता प्रायव्हेट लिमिटेड', 'हाउसफुल-3' अशा चित्रपटांत काम केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लीजा हेडनचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे 9 PHOTOS..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...