आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जनाच्या दिवशी नव-यासोबच लंच डेटवर गेली ईशा, चक्क ऑटोतून करावा लागला प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री ईशा देओल आणि तिचे पती भरत तख्तानी आज म्हणजेच मंगळवारी दुपारी लंच डेटवर गेले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लंच डेटहून परतताना दोघांना त्यांच्या लग्झरी कारमधून नव्हे तर चक्क ऑटोतून प्रवास करावा लागला. झाले असे, की मंगळवारी ठिकठिकाणी गणेश विसर्जन सुरु आहे. मुंबईत गणेश विसर्जनाच्या निमित्ताने मोठमोठ्या मिरवणुका सुरु आहेत. ढोल-ताशांच्या गजरात सगळेजण बाप्पाला निरोप देत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. त्यामुळे ईशा आणि तिच्या पतीने कारऐवजी ऑटोतून प्रवास करण्याचे ठरवले.  

विशेष म्हणजे ईशाने ही ऑटो राइड खूप एन्जॉय केली आणि याचा एक फोटोसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ही राइड अतिशय मजेशीर झाल्याचे ईशाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ईशाने लिहिले, 'विसर्जनाच्या दिवशी लंच डेटहून घरी परतत असताना ऑटोतून प्रवास केला. ही एक स्‍मूथ राइड होती.' 

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची कन्या ईशा देओल लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. लग्नाच्या पाच वर्षांनी ईशा आई होणार आहे. अलीकडेच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमात थाटात पार पडला. विशेष म्हणजे दोनदा तिचे डोहाळे जेवण झाले. पहिल्या कार्यक्रमात ईशा आणि भरत यांचे पुन्हा लग्न लावण्यात आले होते. सिंधी परंपरेनुसार, डोहाळे जेवणाच्या दिवशी ईशा आणि भरत यांचे लग्न झाले. मुंबईतील इस्कॉन मंदिरात हा कार्यक्रम झाला होता. तर ईशाची धाकटी बहीण अहानाने तिच्यासाठी सरप्राईज बेबी शॉवर ठेवले होते. 

पाहुयात, ईशाच्या दोन्ही डोहाळे जेवणाची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...