आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहरा झाकून शूटिंग सेटवर पोहोचली प्रिती झिंटा, एका झलकसाठी चाहत्यांची उसळी गर्दी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'भईया जी सुपरहिट' सिनेमासाठी काशीला पोहोचलेली प्रिती झिंटा - Divya Marathi
'भईया जी सुपरहिट' सिनेमासाठी काशीला पोहोचलेली प्रिती झिंटा
वाराणसी: अभिनेत्री प्रिती झिंटा मंगळवारी (12 जुलै) संध्याकाळी पर्पल लहंग्यात वाराणसीला पोहोचली. यादरम्यान ती चाहत्यांच्या नजरेतून वाचण्याचा प्रयत्न करत होती. कागदाने चेहरा लपवून ती शूटिंग सेटपर्यंत गेली. चाहत्यांनी एक झलक पाहण्यासाठी 'प्रिती मॅडम' म्हणून ओरडत होते. परंतु ती चेहरा लपूनच निघून गेली.
'भईया जी सुपरहिट' सिनेमाचे सुरु आहे शूटिंग...
- प्रिती झिंटाशिवाय बॉलिवूड स्टारकास्ट सनी देओल, अमिषा पटेल आणि आर्शद वारसी हेदेखील काशीत आले आहेत.
- मंगळवारी दुपारी सिगरा स्थित कपड्याच्या शो रुमबाहेर आणि आतमध्ये सेट लावण्यात आला.
- संध्याकाळी 4 वाजेनंतर अचानक पांढ-या रंगाच्या कागदाने चेहरा झाकून सेटवर आली.
- तिचे चाहते तिच्या नावाने ओरडत होते, परंतु तिने चेह-यावरचा कागद बाजूला केलाच नाही.
- प्रिती झिंटा पर्पल कलरच्या लहंग्यात दिसली आणि हातात बांगड्या घातलेल्या होत्या.
शूटिंग स्पॉटवर चर्चेचा विषय ठरली प्रिती...
- संपूर्ण शूटिंग सेटवर लोकांमध्ये एकच चर्चेचा विषय होता, की तिने कागदाने चेहरा का लपवला?
- प्रितीची चाहती अंजलीने सांगितले, की सेलिब्रिटी चाहत्यांचे अभिवादन स्वीकारतात, हात हलवतात, परंतु प्रितीने चेहरा लपवला हे जरा वेगळेच होते.
या ठिकाणी होणार शूटिंग...
- वाराणसीच्या रामनगर किल्ला, चेतसिंह किल्ला आणि घाटांच्या जवळील गल्लीच्या लोकेशनमध्ये सिनेमाचे शूटिंग केले जाणार आहे.
- यूनिटच्या लोकांनी सांगितले, 'सिनेमात सनी देओल दुहेरी भूमिकेत आहेत.'
- यूपीच्या भोजपूरी डॉनच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहेत.
- 10 दिवस बनारसच्या विविध ठिकाणी सिनेमाचे शूटिंग होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रिती शूटिंग सेटवरील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...