आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preity Zinta Talks About Her Yuvraj Singh And Brett Lee

प्रीती झिंटा म्हणाली, \'युवराज सिंग माझा भाऊ, दरवर्षी बांधते त्याला राखी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंगसोबत प्रीती झिंटा - Divya Marathi
युवराज सिंगसोबत प्रीती झिंटा
मुंबईः क्रिकेटपटू युवराज सिंग माझा भाऊ असून त्याला दरवर्षी मी राखी बांधते, असे अभिनेत्री प्रीती झिंटा म्हणाली आहे. हा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे. युवराजच नव्हे तर ब्रेट लीसुद्धा आपल्या भावासारखा असल्याचे ती म्हणाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकेकाळी युवराज सिंग आणि ब्रेट ली यांना प्रीती झिंटाचे बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले गेले होते. याविषयीच प्रीतीने हे स्पष्टीकरण दिले आहे.

मुलाखतीत काय म्हणाली प्रीती...
प्रीती म्हणाली, "मला खासगी आयुष्याविषयी फारसे बोलणे पसंत नाही. जेव्हा कुणी माझ्याविषयीची एखादी गोष्ट कन्फर्म न करता काहीही लिहितो, तेव्हा मला फार विचित्र वाटतं. आता मात्र मला त्रास दिला जात नाही. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या मी मनावर घेतल्या आहेत. जेव्हा माझे नाव युवराज आणि ब्रेट लीसोबत जोडले गेले होते, तो काळ मी कधीच विसरु शकत नाही. हे दोघेही मला माझ्या भावासारखे आहेत. दरवर्षी मी त्यांना राखी बांधत असते."
युवराज सिंग आणि हेजल किज यांच्या लग्नाविषयी प्रीती अतिशय उत्साही दिसली. ती म्हणाली, "तुम्हाला ठाऊक आहे, का लग्न कधी आहे. मी हे यासाठी विचारतेय, कारण स्पेशल गिफ्ट म्हणून मी राखीचा बॉक्स घेऊन जाईल (हसून). युवराज लग्न करतोय, याचा मला आनंद आहे. आमचे बाँडिंग खूप चांगले आहे. तो माझ्या टीमचा (पंजाब किंग्स इलेवन) चा एक भाग आहे. त्याने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत."

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, युवराज सिंग आणि ब्रेट लीसोबतची प्रीती झिंटाची निवडक छायाचित्रे...