आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकणार होती प्रीती, जाणून घ्या का केले कॅमबॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री प्रीती झिंटा लवकरच सनी देओलच्या 'भैय्याजी सुपरहिट' या सिनेमात झळकणारेय. मात्र प्रीती फार पुर्वीच बॉलिवूडला रामराम ठोकाणार होती. अलीकडेच मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये प्रीतीने ही गोष्ट शेअर केली. प्रीती म्हणाली, फार पुर्वीच मी बॉलिवूडला टाटा करणार होती, पण नवरा जीन गुडइनफमुळे मी या क्षेत्रात परतली आहे. फॅशन वीकमध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक गोष्टी शेअर केल्या. प्रीतीने डिझायनर संजुक्ता दत्तासाठी रॅम्प वॉक केला. प्रीतीशिवाय शबाना आझमी, उर्वशी रौतेला, मुग्धा गोडसे, रणवीर बोहरा आणि अदा शर्मासुद्धा या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

लग्नाविषयी कसा आहे प्रीतीचा अनुभव...  
प्रीती सांगते, "मी काही अशी एकमेव स्त्री नाही. अशा लाखो महिला तुम्हाला मिळतील ज्या घर आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखतात. केवळ अभिनेत्री नसल्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. खरं तर या जगातील सर्वात कठीण काम म्हणजे हाउसवाइफ असणं आहे. २24 तास काम करूनही त्यांच कौतुक होत नाही. पण, आमच्यासारख्या व्यावसायिकांचे त्यांच्या कामात कौतुक केले जाते. एक सामान्य स्त्री तर सुपरवुमन असते, असेच मी म्हणेन. त्या घर आणि काम दोन्ही उत्तमरित्या सांभाळतात. माझ्यासाठी हे सरळ आहे की, माझं लग्न झालंय, काम करतेय आणि मी खूश आहे. मी एका अशा व्यक्तिशी लग्न केलंय ज्याने मला स्वतः चित्रपट करण्यासाठी पुन्हा ढकललंय. मी तर चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या तरी मी ‘भैय्याजी सुपरहिट’ व्यतिरीक्त कोणताही चित्रपट करत नाहीये."

'इश्क इन पेरिस'च्या अपयशाविषयी बोलली प्रीती 
प्रीतीची निर्मिती असलेला 'इश्क इन पेरिस' हा सिनेमा फ्लॉप ठरला होता, त्यामुळे त्यामुळे आता पुनर्पदार्पण करताना तुझ्यावर दडपण आहे का? असा प्रश्न केला असता ती म्हणाली, "मला अजिबात दडपण नाहीये कारण ही माझी निर्मिती नाही. एखाद्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची पहिली निर्मिती असलेला चित्रपट पडला तर ठीक आहे. मला अजूनही त्याचा अभिमान आहे. तुम्ही यशापेक्षा तुमच्या चुकांमधून जास्त शिकता असे मला वाटते."  

पुढील स्लाईड्सवर बघा, लॅक्मे फॅशन वीकचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...