आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: हे आहे बॉलिवूडचे खलनायक प्रेम चोप्रा यांचे कुटुंब, तीन मुलींसह कुटुंबात आहेत 14 सदस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः वर डावीकडून - शर्मन जोशी, राहुल नंदा आणि विकास भल्ला. मध्यभागी - मुली पुनिता, रकिता आणि प्रेरणा, पत्नी उमासोबत प्रेम चोप्रा, खाली -वर्यान, वीर, सांची, अयाना, रिशा आणि विहान) - Divya Marathi
(फाइल फोटोः वर डावीकडून - शर्मन जोशी, राहुल नंदा आणि विकास भल्ला. मध्यभागी - मुली पुनिता, रकिता आणि प्रेरणा, पत्नी उमासोबत प्रेम चोप्रा, खाली -वर्यान, वीर, सांची, अयाना, रिशा आणि विहान)
बॉलिवूडचे खलनायक प्रेम चोप्रा यांनी आज वयाची 81 वर्षे पूर्ण केली आहेत. 23 सप्टेंबर 1935 रोजी लाहोर (आता पाकिस्तानात) येथे त्यांचा जन्म झाला. सहा बहीणभावंडांमध्ये ते तिस-या क्रमांकावर होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब शिमल्यात स्थायिक झाले. येथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पंजाब विद्यापीठात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनापासूनच त्यांना अभिनयात रुची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. खरं तर त्यांनी डॉक्टर व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र प्रेम चोप्रा यांनी स्पष्ट शब्दांत यासाठी नकार दिला आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी 50 च्या दशकाच्या शेवटीशेवटी मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांना बराच संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्कुलेशन विभागातही नोकरी केली.

320सिनेमांमध्ये अभिनय
संघर्षाच्या काळात प्रेम चोप्रा यांना 'चौधरी करनैल सिंह' या पंजाबी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 1960 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा तिकिट खिडकीवर चांगलात गाजला आणि प्रेम चोप्रा यांना सिनेसृष्टीची दारे उघडी झाली. पूरब और पश्चिम, हरे रामा हरे कृष्णासह तब्बल तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. देव आनंद, मनोज कुमार, राज कपूर, मनमोहन देसाई, यश चोप्रा, रोहित शेट्टी, विनय शुक्ला, निखिल आडवाणी , राकेश ओमप्राकश मेहरा, श्रीराम राघवन या मागील आणि आत्ताच्या पिढीतील लोकांसोबत त्यांनी काम केले आहे.

14 सदस्यांचे कुटुंब
प्रेम चोप्रा यांचे लग्न उमा यांच्यासोबत झाले आहे. उमा या कृष्णा कपूर (राज कपूर यांच्या पत्नी), प्रेमनाथ आणि राजेंद्रनाथ यांच्या भगिनी आहेत. दिग्दर्शक लेख टंडन यांनी उमा यांचे स्थळ प्रेम चोप्रांसाठी आणले होते. या दाम्पत्याला तीन मुली असून रकिता, पुनीता आणि प्रेरणा चोप्रा अशी त्यांची नावे आहेत. रकिताचे लग्न पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदासोबत झाले आहे. तर दुसरी कन्या पुनीताचे मुंबईतील वांद्रा येथे विण्ड चिम्स नावाची प्री-स्कूल आहे. तिचे लग्न टीव्ही अभिनेता आणि गायक विकास भल्लासोबत झाले आहे. धाकटी मुलगी प्रेरणा ही बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीची पत्नी आहे.

पुनीता आणि विकास यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून सांची आणि वीर ही त्यांची नावे आहेत. तर शर्मन आणि प्रेरणा यांनाही एकुण तीन मुले आहेत. अयाना, विहान आणि वर्यान ही त्याच्या मुलांची नावे आहेत. रकिता आणि राहुल यांना रिशा नावाची एक मुलगी आहे.

प्रेम चोप्रा यांची थोरली कन्या रकिता नंदाने प्रेम यांच्या जीवनावर 'प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा' हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले आहे. एप्रिल 2014 मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, प्रेम चोप्रा यांच्या मुली, जावई आणि नातवंडांची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...