आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prem Ratan Dhan Payo Fails To Beat Bahubali And Bajrangi Bhaijaan

Biggest Opener, मात्र 'बाहुबली' आणि 'बजरंगी...'पेक्षा पिछाडीवरच आहे 'प्रेम रतन धन पायो'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सुपरस्टार सलमान खानचा अलीकडेच रिलीज झालेला 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा बॉलिवूडमध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 40.35 कोटींचा व्यवसाय केला. पहिल्या दिवसाच्या आकड्यांनुसार, आजवर कुठलाही सिनेमा इथवर पोहोचला नव्हता.
रंजक गोष्ट म्हणजे, दुस-या दिवसापासून मात्र सिनेमाच्या कमाईच्या आकड्यांत घसरण बघायला मिळाली. सात दिवसांपर्यंत या सिनेमाची कमाई 165.5 कोटींपर्यंत झाली. याचवर्षी जुलै महिन्यात रिलीज झालेला सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ची सात दिवसांची कमाई 184.6 कोटी झाली होती. अर्थातच 'प्रेम रतन धन पायो' हा बॉलिवूडचा बिगेस्ट ओपनर सिनेमा ठरला असला, तरीदेखील त्याने 'बजरंगी भाईजान'चा रेकॉर्ड मोडित काढलेला नाही. पहिल्या दिवसाची या सिनेमाची कमाई 'बजरंगी भाईजान'पेक्षा 13 कोटींनी अधिक होती.
'बाहुबली'च्या जवळपाससुद्धा फिरत नाही
'प्रेम रतन...'चे सात दिवसांचे कलेक्शन 'बजरंगी...'च्या अवतीभोवती आहे. मात्र याचवर्षी जुलै महिन्यात रिलीज झालेला 'बाहुबली : द बिगनिंग' या सिनेमाची कमाई यापेक्षा कितीतरी अधिक होती. केवळ सात दिवसांत 'बाहुबली...'ने 259 कोटींची कमाई केली होती. म्हणजेच 'प्रेम रतन...'चे कलेक्शन या सिनेमाच्या तुलनेत 100 कोटी मागे आहे. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास, या वर्षांत रिलीज झालेल्या सर्व सिनेमांमध्ये 'बाहुबली' आजही टॉपवर आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बाहुबली', 'बजरंगी भाईजान' आणि 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमांचे सात दिवसांचे (Day-By-Day) कलेक्शन...
नोटः हे सर्व आकडे इंटरनेटवरील विविध स्त्रोतांवर (ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श आणि इतर कलेक्शन वेबसाइट्स) आधारित आहेत.