आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराजपासून ते करीना-रणबीर-नव्यापर्यंत, जाणून घ्या कपूर घराण्यातील प्रत्येक सदस्याविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सगळ्यात मागे डावीकडून -  रीमा, रणधीर कपूर, नीला, कांचन, शम्मी, संजना, शशी आणि जेनिफर.... मध्यभागी डावीकडून बबिता, राजकपूर, कृष्णा, नीतू, राजकपूर यांच्या मांडीवर करीना आणि कृष्णाच्या मांडीवर बसलेली रिद्धिमा कपूर.... खाली राजीव, आदित्य, करिश्मा आणि ऋषी कपूर - Divya Marathi
सगळ्यात मागे डावीकडून - रीमा, रणधीर कपूर, नीला, कांचन, शम्मी, संजना, शशी आणि जेनिफर.... मध्यभागी डावीकडून बबिता, राजकपूर, कृष्णा, नीतू, राजकपूर यांच्या मांडीवर करीना आणि कृष्णाच्या मांडीवर बसलेली रिद्धिमा कपूर.... खाली राजीव, आदित्य, करिश्मा आणि ऋषी कपूर
एन्टरटेन्मेंट डेस्कः कपूर घराण्याची लाडकी लेक करीना कपूर २१ सप्टेंबर रोजी ३६ वर्षांची झाली आहे. करीनाचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत झाला. करीना आता प्रेग्नेंट असून येत्या डिसेंबर महिन्यात ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. करीना राज कपूर यांची नात आहे.

कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीतील मोठे घराणे आहेत. अभिनय तर या घराण्याच्या रक्तात आहे. याच कारणामुळे भारतीय सिनेसृष्टीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत या घराण्याच्या प्रत्येक पिढीने अभिनय क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. दिवंगत पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते यूथ आयकॉन रणबीर कपूरपर्यंत प्रत्येकाने या क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. पृथ्वीराज कपूर यांनी देशाला पहिला बोलपट दिला होता. आज करीना, रणबीर त्यांच्या अभिनयाचा हा वारसा पुढे चालवत आहेत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की कपूर घराणे मुळचे पाकिस्तानातील पेशावरमधील आहे. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. या कुटुंबात हिंदू, जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांचा समावेश आहे. शशी कपूर यांनी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर केंडलसोबत विवाह केला होता. तर त्यांची भाची रीमा कपूरचे लग्न मोहन जैनसोबत झाले आहे. इतकेच नाही तर करीना कपूरचे पती सैफ अली खान पतौडी घराण्याचे नवाब आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कपूर घराण्याच्या सहा पिढ्यांबद्दल सांगत आहोत. शिवाय या घराण्यातील अशा काही सदस्यांविषयी सांगतोय, ज्यांच्याविषयी तुम्हाला ठाऊक नाहीये.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या पृथ्वीराज कपूर यांच्या सहा पिढ्यांविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...