आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: 31 वर्षांची झाली विद्या बालनची बहीण, बॉलिवूडमध्ये थिरकलीये शाहरुखसोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री प्रियामणी)

मुंबई - अभिनेत्री प्रियामणी हिने आज वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. प्रियामणी ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे.
प्रियामणी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतली आघाडीची अभिनेत्री आहे. 4 जून 1984 रोजी बंगळूरुमध्ये जन्मलेल्या प्रियामणीचे पूर्ण नाव प्रिया वासूदेव मणी अय्यर असे आहे. तामिळ ब्राम्हण कुटुंबात प्रियामणीचा जन्म झाला. तिने आपले शालेय शिक्षण बंगळूरु येथील श्री अरबिंदो मेमोरियल स्कूलमधून पूर्ण केले, तर जेसी रोडस्थित कॉटन वुमन्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रियामणीने प्रिंट जाहिरातींसाठी फोटोशूट करने सुरु केले. सध्या ती सायकॉलॉजीचे शिक्षण घेत आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा...
प्रियामणी तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषांमधल्या डझनभरपेक्षाही जास्त सिनेमांमध्ये झळकली आहे, प्रियामणीला 2006 मध्ये 'पारुथी वीरान' या तामिळ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
बॉलिवूडच्या या सिनेमांमध्ये केले आहे काम...
प्रियामणी दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे, मात्र बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. 2010मध्ये आलेल्या 'रावण' या सिनेमात ती अभिषेकच्या बहिणीच्या रुपात झळकली आहे. याशिवाय विवेक ओबरॉय आणि शत्रुघ्न सिन्हा स्टारर 'रक्तचरित्र 2' या सिनेमातही तिने काम केले आङे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाती '1234 गेट ऑन द डान्स फ्लोअर' या आयटम नंबरमध्ये तिने आपल्या डान्सचा जलवा दाखवला होता.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा प्रियामणीचे खास फोटोज...