आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हॉलीवूड रॉयल्स\' कॅटगरीत प्रियांकाची एंट्री, W मॅगझिनवर झळकणार, झाली होती टॉपलेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमेरिकेचे 'W' मॅगझिनने यंदा 'हॉलीवूड रॉयल्स' कॅटगरीत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा समावेश केला आहे. आता मॅगझिनच्या एन्युअल इश्यूच्या कव्हरवर ती झळकणार आहे. प्रियांकाने हॉलीवूड मुव्ही 'बेवॉच' आणि टीव्ही शो 'क्वांटिको'च्या माध्यमातून रसिकांंचे लक्ष वेधूून घेतले होते. इतकेच नव्हे तर, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तिला स्पेशल गेस्ट म्हणून निमंत्रित केले होते. ऑस्कर अवॉर्ड फंक्शनमध्येही ती प्रेझेंटरच्या भूमिकेत दिसली होती.

हॉलीवूड रॉयल्स कॅटगरीत गेम चेंजर्स म्हणून प्रियांकाकडे पाहिले जात आहे. दरम्यान, यापूर्वी प्रियांका 14 वेळा इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हरवर झळकली होती.

प्रियांकासोबत दिसतील या हस्ती....
- कव्हरवर प्रियांकासोबत एली फॅनिंग, ज्यूलिया लुइस ड्रेफस, जोडी फॉस्टर, हॅली बेरी, इरिना शायक, रामी मलेक, सिंडी क्रॉफर्ड, कान्ये वेस्ट सारख्या हस्ती दिसतील.
- गत वर्षी 'हॉलीवुड रॉयल्स'च्या रुपात ज्यूूलियाना मूर, एलेन पेज, क्लेयर डेंस, एलिसन विलियम्स, शार्लोट कॅसिरागीची निवड झाली होती.

थोडं W मॅगझिनविषयी...
- हे एक फॅशन मॅगझिन आहे. 1971 पासून ते अमेरिकेतून पब्लिश होत आहे.
- डिसेंबर, 2012 मधील आकडेवारीनुसार, मॅगझिनचे सर्कुलेशन 4 लाख 59 हजार 628 होते.
- 45 पासून पब्लिश होणार्‍या मॅगझिनचे एडिटर स्टेफनो टॉन्ची आहेत. 80 टक्के वाचक या महिला आहेत.

प्रियांंका झाली होती टॉपलेस...
- कदाचित तुम्हाला माहीत नसावे, काही वर्षांंपूर्वी एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी प्रियांंका टॉपलेस झाली होती. या फोटोशूटचे तीन फोटो समोर आले होते. त्यातील एका फोटोत ती केवळ जीन्समध्येे दिसत आहे.
- अशाच्या एका मॅगझिनसाठी दिलेल्या फोटोशूटमुळेे प्रियांंका चर्चेत आली होती. 'आर्मपिट'वरून ती वादाच्या भोवर्‍यातही सापडली होती. काहीनी ही फोटोशॉप्ट इमेेज म्हटले होते.
-पण खुद्द प्रियांकाने मौन तोडून फोटो वास्तव असल्याचे सांगितले होतेे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, मॅगझिन कव्हरवर अशा असतात बॉलिवूड अॅक्ट्रेसेसच्या Bold अदा...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...