आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजच्याच दिवशी भारताची पाचवी 'Miss World' बनली होती प्रियांका, पाहा 16 वर्षे जुने Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 साली आजच्याच दिवशी प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी केला होता. प्रियांकाचे म्हणणे आहे, की ही इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्ट तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावी केल्यानंतर 2003 मध्ये प्रियांकाने 'द हीरो- लव स्टोरी ऑफ अ स्पाई' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

बरेली कनेक्शन
प्रियांकाचा जन्म झारखंडच्या जमशेदपूर येथे 18 जुलै 1982 रोजी झाला. मात्र तिचे बालपण यूपीच्या बरेली जिल्ह्यात गेले. ती बरेलीला आपले घर समजते. लखनऊच्या लॉ मार्टिनिअर गर्ल्स कॉलेजमधून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानतंर तिने मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यासाठी तिने आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडले.
असे म्हटले जाते, की प्रियांका मिस वर्ल्ड बनल्यानंतर काही दिवस बरेलीला प्रियांका वाला बरेली असे म्हटले जाऊ लागले होते.

आईमुळे बनली मिस इंडिया
प्रियांकाच्या आईने तिची काही छायाचित्रे मिस इंडिया स्पर्धेसाठी पाठवली होती. त्यानंतर तिला या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. हे सर्वकाही प्रियांकासाठी स्वप्नवत होते.

भारताची पाचवी मिस वर्ल्ड
प्रियांकाला फेमिना मिस इंडिया स्पर्धेत दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि मिस वर्ल्ड 2000चा किताब आपल्या नावी केला. मिस वर्ल्डचा ताज नावी करणारी प्रियांका पाचवी भारतीय महिला आहे. 2009 साली तिला मिस वर्ल्ड स्पर्धेत परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, माजी जगतसुंदरी प्रियांका चोप्राची 16 वर्षे जुनी निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...