आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सलमानच्या \'बहिणी\'ने या अॅक्ट्रेसच्या थोबाडित मारली, जाणून घ्या काय होते कारण?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुलकित सम्राट आणि यामी गौतम, दुसरा फोटो- सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा - Divya Marathi
पुलकित सम्राट आणि यामी गौतम, दुसरा फोटो- सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा
मुंबई: सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा आणि पुलकित सम्राट विभक्त होण्यामागे यामी गौतमी असल्याचे बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु आहेत. यामी 'सनम रे' सिनेमात पुलकितची को-स्टार होती. या सिनेमानंतरच दोघांची जवळीक वाढल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळेच पुलकित आणि श्वेता मागील 8 महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.
शूटिंगदरम्यान श्वेताने मारली यामीच्या थोबाडित...
- एका लोकप्रिय वेबसाइटवर छापलेल्या बातमीनुसार, 'सनम रे' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान पुलकित आणि यामी शिमल्यात होते, त्यांच्यासोबत श्वेतासुध्दा होती.
- श्वेताने नोटिस केले, की पुलकित आणि यामीमध्ये काहीतरी सुरु आहे. तिथे जिममध्येसुध्दा एकत्रच जात होते.
- एकेदिवशी जिममध्ये श्वेता आणि यामीमध्ये वाद सुरु झाला.
- यादरम्यान यामी श्वेताला उत्तर देत म्हणाली, 'तुला काय वाटते, मी तुझ्या नव-याला तुझ्यापासून दूर करेल.'
- दोघींमध्ये सुरु असलेल्या वादात श्वेता भडकली आणि तिने यामीच्या कानशिलात लगावली. मात्र यामी मागे सरकली आणि तिला ती चापट बसली नाही.
- त्यानंतर श्वेताने यामीला गेट आऊट म्हणून जिममधून जाण्यास सांगितले.
'जुनूनियत' दिसले यामी-पुलकित...
यामी गौतम 'जुनूनियत' सिनेमात पुन्हा एकदा पुलकितसोबत रोमान्स करताना दिसली आहे. या सिनेमात यामी बोल्ड लूकमध्ये झळकली आहे. सिनेमात ऋषिता भट महत्वाची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 24 जूनला रिलीज झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पुलकित-यामीचे रोमँटिक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...