आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall : जेव्हा हेमाच्या कारच्या धडकेने झाला होता चिमुरडीचा मृत्यू, पाहा घटनेचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानच्या दौसामध्ये लालसोट बायपासवर हा अपघात झाला होता. - Divya Marathi
राजस्थानच्या दौसामध्ये लालसोट बायपासवर हा अपघात झाला होता.
जयपूर - 16 ऑक्टोबर 1948 ला जन्मलेल्या हेमा मालिनी 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडची अॅक्ट्रेस असण्याबरोबरच ती एक क्लासिकल डान्सर आणि लोकसभेची खासदारही आहे. ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमा यांची जीवन अत्यंत ग्लॅमरस राहिलेले आहे. पण 2 जुलै 2015 ला एखा अपघातात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तर याच अपघातात एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामनाही करावा लागला होता. 

असा झाला अपघात.. 
- 2 जुलै 2015 ला हेमा मेहंदीपुर बालाजीचे दर्शन करून मथुरामार्गे जयपूरला जात होत्या. 
- तर अल्टो गाडीमध्ये खंडेलवाल कुटुंब जयपूरहून लालसोटला येत होते. सुमारे 9 वाजता राजस्थानच्या दौसामध्ये लालसोट बायपासजवळ कारने टर्न करताच समोरून येणाऱ्या मर्सिडीजने कारला धडक मारली. 
- यात कारमध्ये प्रवास करत असेलेल हनुमान खंडेलवाल, त्यांची पत्नी शिखा आणि मुलगा शोमिल जखमी झाले तर दीड वर्षांच्या चिन्नीचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर आसपासच्या लोकांनी जखमींना बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट केले. शिखा आणि शोमिल गंभीर असल्याने त्यांना जयपूरच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 

चिमुरडीच्या मृत्यूमुळे हेमा यांच्यावर झाली होती टीका.. 
- या प्रकरणात हेमा मालिनी यांना टीकेचा सामना करावा लागला होता. मीडिया रिपोर्टनुसार अपघातानंतर एका दुसऱ्या कारमधून हेमा मालिनी ड्रायव्हरबरोबर जयपूरला निघून गेल्या होत्या. अल्टो कारमधील जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही. सेलिब्रिटी असल्याने हेमांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. तर पीडितांच्या कुटुंबाला महत्त्व देण्यात आले नाही. चिमुरडी वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचली असतील तर तिचा जीव वाचवता आला असता. 
- अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ड्रायव्हर महेश ठाकूरच्या विरोधात सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. आपघाताच्या वेळी ड्रायव्हर ताशी 150 किमी वेगाने गाडी चालवत होता अशी माहिती मिळाली आहे. 

अपघाताच्या रात्रीच झाली होती हेमाची सर्जरी.. 
जयपुर-आगरा हायवेवर झालेल्या या अपघातात हेमा मालिनीही जखमी झाल्या होत्या त्यांच्या डोक्याला, हाताला आणि कमरेला मार लागला होता. अपघाताच्या रात्रीच तिच्या चेहऱ्याच्या काही भागासह भुवयांचीही प्लास्टीक सर्जरी करावी लागली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अपघाताचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...