Home »Gossip» Radhika Apte Did A Hot Photoshoot

राधिका आपटेने केले Photoshoot, रिव्हिलिंग टॉपमध्ये दिसला बोल्ड अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 12:52 PM IST

मुंबईः सिनेमांमधील आपल्या बोल्ड सीन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री राधिका आपटे हिने अलीकडेच एक फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने एका क्लॉदिंग ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी केले आहे. ब्रॅण्डने या फोटोशूटची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये राधिका रिव्हिलिंग ट्युब टॉपमध्ये दिसतेय. राधिकाचा शेवटची 'कबाली' या तामिळ सिनेमात झळकली होती. आता ती अक्षय कुमारसोबत आगामी 'पॅडमॅन' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
राधिका म्हणाली होती, स्टोरीच्या मागणी असल्यास न्यूडिटी योग्य..
पडद्यावरची भूमिका खरी वाटावी यासाठी अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच आग्रही असते. एखादी व्यक्तीरेखा बोल्ड असेल तर ती माघार घेत नाही. भूमिकेची लांबी किती आहे किंवा पूर्ण लांबीचा चित्रपट असो की शॉर्ट या गोष्टींचा ती विचार करीत नाही. ती आपल्या भूमिकेच्या समर्थनासाठी कुणाची भीडभाड ठेवत नाही. आपली बिनधास्त मते ती रोखठोक मांडत असते. यातून काही वादग्रस्त विधान झाले तरी त्याची पर्वा ती बाळगत नाही.
राधिकाने फेब्रुवारी महिन्यात एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये ती म्हणाली होती, " आपल्या देशात लोकांसाठी चित्रपट म्हणजे मोठी गोष्ट आहे, ते यासाठी भावनीक असतात. पार्च्डमधील नग्न सीनबद्दल काय घडले हे मला चांगले माहिती आहे. जे स्त्री आणि पुरुष याच्याशी जोडले गेले ते विवस्त्रतेच्या पलिकडे जाऊन विचार करणारे होते. आपला प्रेक्षक अपरिपक्व आहे असे मला वाटत नाही."
"जर कथेची गरज असेल तर नग्न सीन्सचे समर्थन होऊ शकते. हेतु चांगला असायला हवा. परंतु मनोरंजनाच्या नावाखाली महिला नग्न होऊन नाचतात ते योग्य नाही," असेही राधिका म्हणाली.

पुढे वाचा, इंटीमेट सीन्स देताना वाटत नाही राधिकाला लाज...

Next Article

Recommended