आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhika Apte Is An Indian Film And Stage Actress, Know More About Her

6 भाषांमध्ये 33 सिनेमे, न्यूड सेल्फी व्हायरल, ही आहे 'मांझी'च्या अॅक्ट्रेसची कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मांझी : द माउंटेन मॅन'मध्ये राधिकाने दशरथ मांझीची पत्नी फगुनियाची भूमिका साकारली आहे. - Divya Marathi
'मांझी : द माउंटेन मॅन'मध्ये राधिकाने दशरथ मांझीची पत्नी फगुनियाची भूमिका साकारली आहे.

पुणेः 21 ऑगस्ट रोजी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर 'मांझी : द माउंटेन मॅन' हा सिनेमा रिलीज होणारेय. सिनेमाच्या रिलीजपूर्वी Divyamarathi.com वाचकांना या सिनेमात दशरथ मांझीच्या पत्नीची भूमिका वठवणा-या अभिनेत्री राधिका आपटेविषयी सांगत आहे. पुण्यात जन्मलेल्या मराठमोळ्या राधिकाचे बालपण आणि शिक्षण याच शहरात झाले आहे.
राधिकाने 2005 मध्ये 'वाह! लाइफ हो तो ऐसी' या सिनेमाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत राधिकाने सहा वेगवेगळ्या भाषांत 33 सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या बोल्ड अंदाजाने राधिकाने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी इमेज तयार केली आहे. इतकेच नाही, तर अनेक वादांतही तिचे नाव अडकले आहे.
पुणे शहराशी नाते...
7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेल्या राधिकाने येथील फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आहे. ती पुण्याच्या प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चारु आपटे यांची मुलगी आहे. तिचे आईवडील याच शहरात वास्तव्याला आहेत. राधिका सुटीच्या काळात नेहमी पुण्यात येत असते. बालपणीपासूनच तिला अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुण्यातील आसक्त या मराठी नाट्यसंस्थेत एन्ट्री घेतली. पूर्ण विराम, मात्र-रात्र आणि कन्यादान या मराठी नाटकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या. 'अंतहीन' या बंगाली सिनेमा राधिकाने वृंदा नावाचे पात्र साकारले होते. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
कथ्थक नृत्यांगणा आहे राधिका
'शोर इन द सिटी' हा हिंदी सिनेमा रिलीज झाल्यानंतर राधिका कंटेम्परेरी डान्स फॉर्म शिकण्यासाठी वर्षभर लंडनला होती. याविषयी एका मुलाखतीत तिने सांगितले होते, नृत्याची आवड असल्याने लंडनमध्ये असताना बाराबार तास ती नृत्याचा सराव करायची.
ब्रिटीश बॉयफ्रेंडसोबत थाटले लग्न
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश बॉयफ्रेंड बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले. बेनेडिक्ट लंडनस्थित म्युजिशिअन आहे. लंडनमध्ये असताना राधिका आणि बेनेडिक्टची भेट झाली, पुढे त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि लग्नात झाले.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, सहा भाषांमध्ये 33 सिनेमे...