आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhika Apte Revealed, \'I\'ve Been Asked Not To Tell People That I’m Married

मराठमोळ्या राधिकाचा धक्कादायक खुलासा, \'दिग्दर्शकांना हवी असते Unmarried हीरोईन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीक्यू मॅगझिनमधील राधिकाची घायाळ करणारी अदा... - Divya Marathi
जीक्यू मॅगझिनमधील राधिकाची घायाळ करणारी अदा...

एन्टरटेन्मेंट डेस्कः हिंदीत 'शोर इन द सिटी', 'बदलापूर', 'हंटर' आणि मराठीत 'लय भारी' या सिनेमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. अल्पावधीतच राधिका तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सिनेमेच नव्हे तर 'अहल्या'सारख्या शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनयात वेगळी उंची गाठली. मंत्राच्या जाहिरातीत प्रेग्नेंट इंडिपेंडंट महिलेची दमदार भूमिका साकारुन राधिका इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठेल, यावर शिक्कामोर्तब जणू झाले आहे.
मुळची पुण्याची असलेल्या राधिकाने 'वा! लाइफ हो तो ऐसी' या सिनेमातून हिंदीत एन्ट्री घेतली. हा सिनेमा केला, तेव्हा तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण सुरु होते. त्यानंतर तिने तेलगू, मराठी, मल्याळम आणि बंगाली सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. भूमिका लहान असो वा मोठी तिने साकारलेल्या सर्वच भूमिकांचे विशेष कौतुक झाले आहे.
डस्की ब्युटी असलेल्या राधिकाने अलीकडेच जीक्यू या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी एक सेन्शुअस फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसोबतच मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत दिग्दर्शकांना अनमॅरिड हीरोईन हवी असल्याचे, राधिकाने म्हटले आहे. यासह स्वतःविषयीची एक खास गोष्टही तिने शेअर केली आहे.
राधिका विवाहित असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. पण इंडस्ट्रीत विवाहित अभिनेत्रींना नव्हे तर अविवाहित तरुणींना दिग्दर्शक अधिक भाव देतात. दिग्दर्शकांना अविवाहित अभिनेत्री हवी असते, हा धक्कादायक खुलासा स्वतः राधिकाने केला आहे. अलीकडेच तिने जीक्यू मॅगझिनसाठी एक सेन्शुअस फोटोशूट केले. या फोटोशूटदरम्यान राधिकाने स्वतःविषयीच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
लग्नाविषयी काय म्हणतेय राधिका वाचा, पुढील स्लाईडमध्ये आणि सोबतच पाहा, जीक्यू मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटची खास छायाचित्रे...