आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिकाच्या या शॉर्टफिल्मने घातला होता धुमाकूळ, असा होता Bold & Beautiful अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अहल्या' या शॉर्ट फिल्ममधील वेगवेगळ्या दृश्यांत राधिका आपटे. - Divya Marathi
'अहल्या' या शॉर्ट फिल्ममधील वेगवेगळ्या दृश्यांत राधिका आपटे.
मुंबई - 'कहानी' या सिनेमाच्या यशानंतर यशानंतर दिग्दर्शक सुजॉय घोष यांची 'अहल्या' ही बंगाली शॉर्ट फिल्म रिलीज झाली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये मराठमोळ्या राधिका आपटे हिने मुख्य भूमिका साकारली आहे. 'अहल्या' ही जगातील सर्वात सुंदर स्त्री असल्याची पुराणकथा आहे. मात्र व्यभिचाराच्या संशयातून तिचे पती गौतम ऋषी यांनी तिला शाप दिल्याचे म्हटले जाते. याच कथेला सुजॉय घोष यांनी मॉडर्न टच दिला आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांनी शिल्पकाराची भूमिका साकारली आहे, तर राधिका त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
 
एका हरवलेल्या व्यक्तीच्या शोधात पोलिस इंद्र (तोता रॉय चौधरी) या दाम्पत्याच्या घरी येतो आणि एका रहस्यनाट्याला सुरुवात होते. शॉर्टफिल्ममध्ये टप्प्याटप्प्यावर कथेला कलाटणी मिळत जाते, त्यामुळेच शेवटापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा कायम राहते. कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर बनलेली ही 14 मिनिटांची शॉर्ट फिल्म आहे. सुजॉय घोष यांनी शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरल्यामुळे 14 मिनिटे स्क्रिनवरुन प्रेक्षकांचे लक्ष विचलित होत नाही. या सस्पेन्स-थ्रिलर फिल्ममध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे बघून अंगावर शहारे उभे राहतात. या फिल्ममध्ये राधिकाच्या जवळ जाणारी व्यक्ती कशी दगड बनते, हे दाखवण्यात आले आहे. सुजॉय यांनी ही शॉर्ट फिल्म ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठीच तयार केली आहे. 

ही शॉर्ट फिल्म तुम्ही पुढच्या स्लाईडमध्ये बघू शकता...
बातम्या आणखी आहेत...