आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 वर्षीय राहुल रॉय पुन्हा एकदा प्रेमात, या मॉडेलला करतोय डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 1990 च्या 'आशिकी' या सुपरहिट म्युझिकल ड्रामामध्ये झळकलेला अभिनेता राहुल रॉय पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. मॉडेल साधना सिंहची एन्ट्री त्याच्या आयुष्यात झाली आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. राहुलचा काही महिन्यांपूर्वीच राजलक्ष्मी खानवलकरसोबत घटस्फोट झाला. त्यांचे 2000 मध्ये लग्न झाले होते.
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडेल याचा विचार केला नव्हता..
एका मुलाखतीत राहुलने आपल्या नवीन नात्याविषयी सांगितले. तो म्हणाला, ''घटस्फोटानंतर पुन्हा एकदा कुणाच्या प्रेमात पडेल, याचा मुळीच विचार केला नव्हता. तुटलेल्या नात्यातून बाहेर पडणे खूप कठीण आहे. मात्र साधनासोबत भेट झाल्यानंतर सर्वकाही बदलले. ती माझ्यासाठी परफेक्ट आहे.
साधनासोबतच्या नात्याविषयी गंभीर असून तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय राहुलने घेतला आहे.''
कधी करणार रिलेशनशिपची घोषणा
याविषयी राहुल म्हणाला, ''आमच्या रिलेशनशिपला कसे पुढे न्यायचे, याचा विचार आम्ही दोघे करत आहोत. जेव्हा दोघे यासाठी तयार असू तेव्हा आम्ही आमच्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली देऊ.''
पुढे पाहा, राहुलची नवी प्रेयसी साधना सिंहची छायाचित्रे...