आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वीच एकत्र राहत होते राज-स्मिता, या सेलेब्सनेही उचलले असे धाडसी पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- राज बब्बर, स्मिता पाटील, रणबीर कपूर आणि कतरिना कैफ)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता आणि राजनेता राज बब्बर यांनी गुरुवारी (23 जून) 64वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज बब्बर यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या टुंडला जिल्ह्यात 23 जून 1952 रोजी झाला. त्यांनी आग्रा कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले. त्यांनी बॉलिवूमध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. आज आपल्या समाजात लिव्ह इन रिलेशनशिप सामान्य बाब झाली आहे. असे म्हटले जाते, की बॉलिवूडमध्ये राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह इन रिलेशनशिपला सुरुवात केली. तसे पाहता स्टार्सचे खासगी आयुष्य नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. त्यामुळे हे कलाकार कुणासोबत डेट करतात, कुठे फिरतात, कुणासोबत राहात आहेत, या सर्वांची बरीच चर्चा रंगत असते.
ऐंशीच्या दशकात मात्र लिव्ह इनमध्ये राहणे हे मोठे धाडसी पाऊल होते. राज बब्बर यांनी समाजाच्या सर्व बंधनांना झुगारुन स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे धाडस दाखवले. यामुळे त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली. काही दिवसांनी राज आणि स्मिता यांनी लग्नदेखील केले.
आताच्या काळात तर बॉलिवूडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता तर काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब-याच सेलेब्सनी आपले नाते संपुष्टात आणले. तर काहींनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.
रणबीर कपूर कतरिना कैफ-
2014च्या शेवटी बी-टाऊनचे हे कपल लिव्ह-इनमध्ये राहायला लागले. रिपोर्ट्सनुसार, रणबीरच्या शस्त्रक्रियेनंतर कतरिना त्याची काळजी घेण्यासाठी दोघे एकाच छताखाली राहू लागले होते. बातम्यांनुसार, वडील ऋषी कपूर यांना रणबीरची गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत घरी जाणे पंसत नव्हते. कदाचित म्हणूनच रणबीरने नवीन आशियाना खरेदी केला होता. पूर्वी रणबीर वडील ऋषी आणि आई नीतू यांच्यासोबत वांद्र्यातील घरी राहत होता. परंतु आता तो आई-वडिलांसोबत न राहता कतरिनासोबत राहत होता. दोघे कार्टर रोडजवळ एका आलिशान फ्लॅटमध्ये वास्तव्याला होते. मात्र काही दिवसांपूर्वी दोघे वेगळे झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडचे कोण-कोणते सेलेब्स लिव्ह-इनमध्ये राहिले आहेत...
बातम्या आणखी आहेत...